Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

शुभ मंगल ऑनलाईन...

शुभ मंगल ऑनलाईन...

1 min
242


आवडती टीव्ही मालिका...

 मंगल ऑनलाईन...शुभ


मराठीत बऱ्याच टीव्ही मालिका येऊन गेल्या. समाजाचे भान ठेवून प्रत्येक मालिकेने वेगवेगळे विषय खूप छान पद्धतीने हाताळले. काही कौटुंबिक तर काही वेग वेगळ्या विषयांची उकल करणाऱ्याही मालिका झाल्या. काही विषयाशी पिंगा घालणाऱ्या तर काही खिळवून ठेवणाऱ्याही मालिका झाल्या.सध्याच्या काळात कोरोनाने थैमान घातले आणि सर्वच गिष्टींमधले अंतर वाढले. नव्या प्रथा ,नवे मापदंड,नवे विचार आणि कालानुरूप होणारा बदल यातून वेगवेगळ्या कल्पना संकल्पना सामोर आल्या आणि एक वेगळे रसायन तयार झाले त्याची झलक म्हणजे सध्या टीव्ही वर चालू असलेली मालिका "शुभ मंगल ऑन लाईन...विषय साधाच पण अगदी घराघरात, मनामनात घर करून राहणारा,किलवून ठेवणारा ,हलका फुलका आणि मस्त करमणूक करणारा. त्यातली पात्रे ही आपली ओळख वेगळ्याच धाटणीची करून देतात आपले मी पण छान पैकी सावरतात त्यामुळे नकळत आपण गुंतले जातो आणि हेच या मालिकेचे खरे श्रेय आहे. सध्या तरी मला ही मालिका पहावी वाटते म्हणजे आवडते म्हणायला काही हरकत नाही.


भयाच्या पार्श्वभूमीवर

शुभ मंगल ऑनलाईन आले

पहाता पहाता पहा कसे

ऋणानुबंधाचे नुतनीकरण झाले...

तू तिथे मी इथे म्हणता म्हणता

कांदे पोहेही ऑनलाईन खाल्ले

दिवळीतही म्हणे बांधले आम्ही

मनोमनीच ऑनलाईन किल्ले...


Rate this content
Log in