STORYMIRROR

SWATI WAKTE

Children Stories

4  

SWATI WAKTE

Children Stories

जादू

जादू

2 mins
384

राघव दहा वर्षाचा मुलगा असतो. त्याला जादूच्या खेळाचे विशेष आकर्षण असते. तो यु ट्यूब वर नेहमी जादूचे खेळ बघतो. ते बघून तो ते शिकतोही. नेहमी त्यातच गुंतलेला असल्यामुळे त्याचे अभ्यासात ही दुर्लक्ष होते. तो खुप अभ्यासात मागे पडतो. त्याच्या रिझल्टच्या दिवशी जेव्हा त्याचे बाबा जातात तेव्हा शिक्षक त्याचा रिझल्ट त्यांना दाखवतात आणि सांगतात त्याची अशीच अभ्यासात प्रगती राहिली तर प्रॉब्लेम होईल. त्याचे आई बाबा घरी आल्यावर त्याला समजावतात अरे राघव हे जादूचे खेळ बघणे आणि खेळणे आता तु सोडून दे. तु जे जादूचे खेळ आहे ते काय फक्त हातचलाखी आहे खरी जादू मी तुला शिकवते. अशी त्याची आई त्याला समजावते उद्यापासून फोन यु ट्यूब बंद तु माझ्याजवळ बस. बघ तुला इतके मार्क्स आता कमी आहेत आपण ह्याला जादुने वाढवू. राघव म्हणतो खरच जादुने माझे मार्क्स वाढतील. आई म्हणते हो खरच. आई आधी त्याला शाळेच्या आधी सकाळी योग करायची सवय लावते. सुरवातीला राघवला आदर्श आसने जमत नाहीत पण हळूहळू त्याला जमू लागतात. ती त्याला शिरसासन ही शिकवते ते त्याला बिलकुलच जमत नाही पण आधी भिंतीच्या साहाय्याने नंतर कुठल्याही सपोर्ट शिवाय त्याला जमते. त्याला त्यात गोडी निर्माण होते. तसेच त्याची एकाग्रताही वाढते. आई त्याला शालेतून आल्यावर विषय परत समजवून देऊन त्यावरील प्रश्न देते. अभ्यासाचीही गोडी राघवला निर्माण होते.पुढची जेव्हा परीक्षा होते. तेव्हा राघव वर्गातून पहिला येतो. राघवला खुप आनंद होतो.


आई त्याला सांगते खरी जादू तीच असते जे आपण कष्ट करून यश मिळवतो. राघवलाही ते पटते.


Rate this content
Log in