STORYMIRROR

Akash Mahalpure

Others

3  

Akash Mahalpure

Others

माझा भारत देश महान..!

माझा भारत देश महान..!

1 min
546

सत्ता प्रजेने स्थापिली

प्रजा सत्तेचा हा मान

सत्ता प्रजेच्या हक्काची

       दिला ज्याने बहुमान।।


असा देश हा महान

याची सावरुया शान

देऊ ध्वजास सलामी

         याची उंचवून मान।।


करु बळीचा सन्मान

बळी भारताची शान

सारे मिळून करुया

        पुन्हा किसान महान।।


देशासाठी दिले प्राण

सारे स्मरु ते जवान

करु कन्येचं रक्षण

       नारी शक्ति ही महान।।


वृक्ष पर्जन्याची साक्ष

त्यांचे वाढवू प्रमाण

खऱ्या अर्थाचा तेव्हाच

        माझा भारत देश महान।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन