STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Others

3  

MEENAKSHEE P NAGRALE

Others

भारत भूची आम्ही लेकरे

भारत भूची आम्ही लेकरे

1 min
940

भारतभूची आम्ही लेकरे

एकदिलाने राहू

तिरंगा आमची शान आहे

उंच फडकता पाहू.....


जीव की प्राण आहे

आमचा तिरंगा

डोळे काढून टाकू

दिसला जर फीरंगा.....


या भारत भू ची आम्ही लेकरे

मातृभूमी आमची प्रिय

रक्षणासाठी सज्ज आम्ही

आहे प्राणाहूनही प्रिय....


एक दिलाने एक मनाने

हाती तिरंगा घेऊ

देशासाठी जगणे आमचे

विश्वात पराक्रम दावू....


हा देश शूरविरांचा

तिरंगा आमची शान

तिरंग्यासाठी सदैव आम्ही

लावू पणाला प्राण.....


Rate this content
Log in