माझी आई
माझी आई
आई माझी मला
द्यायची नेहमी प्रेरणा
खंबीर तिचं नेतृत्व
खंबीर करतं मना.....!!
संकटात घाबरायचे नाही
तिला तिनेच मज धडा
हिरकणीची गोष्ट सांगायची
कसा चढला कडा....!!
संस्कार तिचे खूप छान
लावायची करायला नमस्कार
डोळसपणे वागायची खूप
सांगे नसतो कसला चमत्कार...!!
पाच वर्षाची असताना
शिकवलं हात धरून लिहायला
एक एक अंक काढायला व
एक एक अंक वाचायला....!!
बचत करावी म्हणायची
लावली सवय बचतीची
चारचौघांत शिस्तीत रहावं
क्षमता असावी बसण्याची....!!
खूप दिली मला प्रेरणा
खूप मिळालं बळ जगण्याचं
आले जरी लाख संकट
धैर्याने सदा लढण्याचं....!!
