Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Mangesh Medhi

Others

2  

Mangesh Medhi

Others

अनमोल ठेवा

अनमोल ठेवा

1 min
6.8K


बाबा ! समजतय मला

जाणवतेय तुमची चिंता

कळतय दु:ख,

मी समजु शकतो

काळजी वाटणारच तुम्हाला !

पण......

निश्चिंत असा

काळजी घेईनच मी

नक्की......

जपेन मी तीला

अगदी तुम्ही जपले तसेच

मी समजु शकतो !

बोलणे सोपे आहे

कितीही काहीही म्हटले !

तरी....

आजवर एवढे वर्ष वाढवले

संभाळले, जपले, लाड पुरवले

गुण, संस्कार, ज्ञान देऊन

शिकवले, घडवले

अन.....

आज ह्या एके दिशवी

सगळ सगळ सोपवून

कन्या दान करणे

आपली आपली म्हणता

परकी होताना !

सोपे नाही, त्रास तर होतोच ना !

बघत होता तुम्ही,

तीलाच.....

अजुनही तशीच दिसली ना

दोन वेण्या घातलेली

हसत खिदळत बागडणारी

शाळेत जाणारी !

कॉलेज कुमारी

तुमच्या घरची

कन्या कुमारी, लक्ष्मी

कौतुके फुललेली !

होता होता काळ सरला

अन....

हा दिस आला

पण..

ती आता आमची गृह-लक्ष्मी

त्याच मानाने, सन्मानाने

आदरानेच नांदेल !

काळजी नसावी....

मी फक्त तीला नेत नाही

बरोबर तुमचे प्रेम, माया

तीच्या प्रति काळजी

सार सार नेणार

द्याल ना हे ही दान ?

जपेन मी हे

माझ्या मनीच्या कोंदणात

देत राहीन तीला वेळोवेळी

हे सारे आयुष्यभर !

अन......

जपेन तीलाही आयुष्यभर

अगदी तुम्ही जपले तसेच

मी वचन देतो !

हा अनमोल ठेवा तुमचा

अनमोलच राहील सदैव.


Rate this content
Log in