आदिवासी व यंत्रमानवाचा संवाद
आदिवासी व यंत्रमानवाचा संवाद
1 min
444
यंत्रमानव पोहचला आदिवासींच्या राज्यात
आणि सुरू झाला संवाद त्यांच्यात!
यंत्रमानवा प्रगती तू केली असेल या 'भू' वर
नकोस आम्हाला तुझी घुसखोरी
आमच्या आरक्षित जमिनीवर!
असेलो जरी आम्ही मागासलेलो आदिवासी
तुझ्या नजरेतुन
तरी नकोस आम्हा तुझी घुसखोरी आमच्या राज्यात!
करू दोन हात तुझ्या संगे
आमच्या पारंपारिक शस्त्र
मशाली-भाले घेवून हातात!
आपल्याच भाषेत करत होते संवाद
आदिवासी यंत्रमानवाशी
यंत्रमानव होता शांत
बोलण्या त्याच्याकडे नव्हते एक ही शब्द!!