डोंगर पोखरून
डोंगर पोखरून
1 min
506
डोंगर पोखरून
बहुमजली आधुनिक
सुखसोयींनी सज्ज
इमारतींचा समूह
बांधायच्या होत्या
त्या जागी
आधुनिक यंत्रे
मनुष्यबळ वापरत
पोखरत राहिले
डोंगर रात्रंदिवस
यश नाही
हाती लागले
पोखरण्या डोंगर
आधुनिक घराचे
स्वप्न पाहणाऱ्यांचे
पैसे लंपास
करूनी ते
दुर देशी
गेले पळुन