नवरात्री - रंग पिवळा
नवरात्री - रंग पिवळा
1 min
206
मातीला मिळाला स्वतःचा गंध
सोनचाफा देती वाऱ्याला सुगंध
आनंदाचे प्रतीक
पिवळा चाफा हा ओला
अन धरतीही ओली
पावसात पाखरे
चिंबही झाली
पाऊस पिऊन झाडे ही
सोन चाफ्याने नटली
डौलत डौलत बहरत सुटली
निसर्गाच्या अविष्काराने
चैतन्य सारे पसरले
सोनचाफ्याचे दान
देवीस अर्पिले !!
सोनचाफ्याचे दान
देवीस अर्पिले !!