उंबरठा
उंबरठा
1 min
1.4K
उंबरठ्यावरचं माप ओलांडून
तिलाच जाव लागत दुसर्या घरात ...
घरात जे काही घडतं,
ते तिला ठेवाव लागत ओठात.
माहेरवाशीयांचा सज्जड दम ,
सारं विश्व आता त्याच घरात .....
घराबाहेर पडायचा विचार येता मनात ,
ऐकवल जात ,
उंबरठ्याबाहेर पाऊल टाकलस तर ,
थारा नाही पुन्हा या घरात ....
तिला आता प्रश्न पडतात ,
आता ती विचारते
उंबरठा फक्त तिलाच का ?
आणि कशासाठी उंबरठा ?
त्यावर सांगितलं जात ,
उंबरठ्यान घराची चौकट पूर्ण होते,
घराची चौकट मोडली जाऊ नये
आणि बाईन चौकटीत रहाव म्हणून ....
आता तिन घराचा
उंबरठाचं टाकलाय काढून
आणि चौकट ही टाकली मोडून ,
आता ती घेतेय मोकळा श्वास
आणि करतेय मुक्त संचार जगात.