Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Lata Rathi

Others


2  

Lata Rathi

Others


या जगण्यावर शतदा प्रेम करावे

या जगण्यावर शतदा प्रेम करावे

3 mins 594 3 mins 594

     रात्रीचे अकरा, साडे अकरा वाजले असतील.... अमावसेची भयाण काळीकुट्ट रात्र....सळसळणाऱ्या झाडांच्या पानांचा आवाज... रातकिड्यांचा किर्रर्रर्र किर्रर्रर्र असा आवाज....मधेच पायाखालून सर सर आवाज करीत जाणारे साप....प्राण्यांचा कुई कुई आवाज.....

   

   पण "ती" न घाबरता, न भीता भर भर चालत होती. तिला माहीत सुद्धा नव्हते, आपण कोठे चाललोय, जिकडे पाय नेतील तिकडेच जायचं.... हा जणु निर्धारच तिचा...


चालत चालत ती एका उंच टेकडीवर पोहोचली, खाली खाई..आणि वर ती.... 

पण तिच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नाही. त्या खाईत ती स्वतःला झोकुन देणार....

 इतक्यात मागून दोन बळकट हातांनी तिला मागे ओढलं.

ती खुप घाबरली.....त्याचा हात झटकून सोडायचा प्रयत्न करू लागली.

ती ओरडली, "सोडा मला, मला मरायचंय, नाहीं जगायचं" 

कोण तुम्ही? का वाचवलं मला?


"तो" जवळपास पस्तिशीच्या आसपास असावा......दाढी वाढलेली, पण व्यवस्थित असं राहणीमान.

अगं, देवाने इतकं छान आयुष्य दिलंय, तर का स्वतःला मरणाच्या दाढेत झोकायच. 


"ती" रडू लागली, अश्या जगण्यापेक्षा मरण यातना बऱ्या हो...नाही जगायचं मला...ती परत धावू लागली, त्यानें परत तिला वाचवलं....

नाही! मी असं मरु नाहीं देणार तुला! आत्महत्या महान पाप आहे..

ती- तुम्ही कोण? का मला वाचवता?

ती तिथेच बसली, आणि रडू लागली. त्याने तिला रडू दिलं, रडल्यानंतर ती थोडी सावरली....

तो- एवढ्या रात्री तू अशी एकटी जंगलात कशी?

ती- मी कंटाळले हो, जीवनाला...रोजच्याच त्या मरणयातनेला....जीव नकोसा झालाय!

तो- एक मित्र म्हणून तु मला सांगू शकतेस... जर तुझी इच्छा असेल तर...जमलं तर काही मदत करू शकेन..

का , कोण जाणे, तिला असं वाटलं, तोही कुठल्यातरी दुःखातून सावरलेला असावा. 

ती सांगु लागली....

 बाप दारुड्या, रोज दारू पिऊन यायचं, घरीं येऊन आईला मारायचं....लहानपणापासून मी हेच बघतेय. कंटाळून शेवटी आईने आत्महत्या केली....

असं वाटलं आता तरी बाबा सुधरतील....पण कसलं काय?

चार दिवस बरा राहिला...परत सुरू...

आता तर अजूनच जास्त वाढलंय दारू पीनं....पण आता रोज आपल्या दारुड्या मित्रांना घरी घेऊन येतो. घर कसलं... झोपडीच ती. रात्रभर त्यांच दारू पिऊन बडबडन सुरू असत, आणि मी स्वतःला आत कोंडून घेते. बापाला जास्त पाजून त्यांची ती घाणेरडी नजर माझ्यावर असते. काल तर एकाने माझ्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. पण मी बचावले त्याच्या तावडीतून, आणि पळत सुटले.... ते कधीच परत न जाण्यासाठीच....

पण....तुम्ही वाचवलं मला....

पण मी परत नाही जाणार?

तो- "दोन घडीचा डाव

त्याला जीवन ऐसें नाव" जन्मापासून मृत्युपर्यँत आपली साथ एकच गोष्ट देते, ते म्हणजे आपलं शरीर. 

कितीतरी जन्मानंतर मनुष्य जन्म मिळतो, आणि त्याला अस वाया घालवायच! छे! 

अग मीसुद्धा तुझ्यासारखाच...

बाबा दारू पिऊन आईला मारायचे, एकदा मला खूप राग आला, ते आईला मारत होतें, मी बाबाना ढकललं....पण ते खाली पडले, त्यांच्या डोक्याला लागलं, अति दारूचं सेवन, आणि लागल्यामुळे रक्तस्त्राव जास्त. त्यामुळे ते वाचू शकले नाही, पोलीस केस झाली माझ्यावर खुनाचा आरोप आला... काहीही चूक नसताना... मी तुरुंगात गेलो. आई हा धक्का सहन करू शकली नाहीं....इकडे मी तुरुंगात तर तिकडे आईने प्राण सोडले....

माझ्या चांगल्या वर्तणुकीमुळे माझी सजा कमी झाली, आणि मी तुरूंगातून सुटलो.

 गावात आलो पण एक "खुनी" म्हणून सगळे माझ्याकडे बघायचे. पण मी ठरवलं आपली जशी दारूपाई दुर्दशा झाली, तशी इतरांची नको व्हायला.

आता मी माझं स्वतःच "समुपदेशन केंद्र"उघडलय....


एवढ्यात कोंबडा आरवला....

दिवस निघालाय, सूर्याची सोनेरी किरण झाडातून डोकावतायेत. त्या उगवत्या सूर्याच्या साक्षीनं तिने पण समुपदेशन केंद्रात काम करण्याचा ठरवलं.

समाजामध्ये असे अनेक लोकं आहेत, जे दारू आणि अनेक व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत, त्यांना खरंच गरज आहे ती योग्य समुपदेशनाची.... 

आपल्याला ज्या यातना भोगाव्या लागल्या, त्या इतरांना होऊ नयेत म्हणून आज दोघेही झपाटून काम करताहेत,,बऱ्यांच्य जणांचं आयुष्य पालटलं. 

त्यांनी लग्न सुद्धा केलं..पण त्याच कार्य अजूनही सुरू आहे.

त्याने तिला वाचवलं....एक जीव वाचला...आणि या दोन जीवांमुळे अनके परिवार वाचले.

मला आठवल "मंगेश पाडगावकर" याच गीत...ज्याला सूर दिले होते ...अरुण दाते यांनी

"या जगण्यावर या मरणावर

शतदा प्रेम करावे".....

"जीवन अनमोल आहे, त्यावर प्रेम करा"


आवडल्यास share करा पण माझ्या नावासह ही नम्र विनंति


Rate this content
Log in