वर्ष २०१९
वर्ष २०१९
तारखांच्या जिन्या मधून डिसेंबर पळतो आहे आयुष्यातला एक एक मोठी गळतो आहे.
काही जमा काही उणे आयुष्याची वजाबाकी
सगळीच वर्षे नसतात एकसारखी.
प्रत्येक वर्ष प्रत्येकाला काहीतरी देते आणि काहीतरी हिरावून घेते असंच 2019 माझ्यासाठी छान गेल. या वर्षातील महत्वाच्या घटना म्हणजे, कधी विचार देखील केला नव्हता अशी
१)कैलास मानस सरोवर परिक्रमा यात्रा पार पडली. व्यवस्थित तीन दिवसाची परिक्रमा पूर्ण झाली. म्हटले तर शंकरानेच करवुन घेतली.
२)मोठा मुलगा चांगल्या मार्कांनी डिग्री पास झाला व छोटा मुलगा डिप्लोमा पास झाला मुलांच्या आघाडीवर आनंद आणि सुख मिळाले.
३)यावर्षी महिला दिनाच्या निमित्ताने पहिल्यांदा वुमन्स बाईक रॅली मध्ये भाग घेतला.
४)साहित्यक्षेत्रात बऱ्याच ठिकाणी कथा कविता अभिवचन यात सहभाग घेतला. दहा ते पंधरा प्रशस्तीपत्रके मिळाली स्टोरी मिरर "नॉन स्टॉप नोव्हेंबर" या स्पर्धेत ट्रॉफी मिळाली.
५)यावर्षी भटकंती बरीच झाली. मे मध्ये छोटी जवळची ट्रिप माथेरान, जुलैमध्ये कैलास मानसरोवर, सप्टेंबर मध्ये लोणावळा भुशी डॅम, ऑक्टोबर मध्ये दिल्ली आणि नोव्हेंबर मध्ये हैदराबाद श्रीशैल्यम तिरुपती महाबलीप
ुरम आणि चेन्नई नातेवाईकांमध्ये भाच्या मुलांच्या मुंजी झाल्या तोही एक प्रवास ठाणे यमाई औंध ब्रह्मनाळ तेथून नृसिहवाडी असा केला.
६)एक चुलत बहीण गमावली. एका दृष्टीने सुटली कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी गेली चार वर्षे झगडत होती.
७)माझ्या नोकरीला तेहतीस वर्षे पूर्ण झाली हे झालं वैयक्तिक पण राष्ट्रीय पातळीवर पण बऱ्याच घडामोडी झाल्या.
८) 14 फेब्रुवारीला पुलवामा अटॅक सारा भारत दुःखामध्ये, आपले 50 जवान शहीद झाले अशा बातमीने खूप दुःख होते. तरी बर तेराव्याच्या आत मोदीजींनी त्याचा बदला घेतला आणि त्यांचे 300 अतिरेकी मारले हे म्हणतात दुःखात सुख.
९)मनोहर पर्रिकर सुषमा स्वराज आणि वाजपेयी यासारखे सज्जन निस्वार्थी मोहरे गमावले या वर्षातली अजून एक दुःखद घटना हैदराबाद मधील दिशा प्रकरण चौघांनी केलेले बलात्काराचे प्रकरण साऱ्या देशभर गाजले आणि त्याचा रिझल्ट देखील तितकाच धक्कादायक म्हणून तो लोकांना सुखावणारा होता
१०)यावर्षी खूपच धुवाधार पाऊस पडला लोकांचे पर्यायाने देशाचे नुकसान झाले.
११)या वर्षात मोदीजींनी ट्रिपल तलाक आणि 370कलम ही दोन मोठी बिले पास करून घेतले एकंदरीत संमिश्र फळाचे जवळ जवळ 90% वर्षे छान गेले आहे