वर्दीमधील माणुसकी
वर्दीमधील माणुसकी


कोरोना लाॅकडाऊनमुळे सर्व घरात अडकून पडले आहेत. कुठेच जाता येत नाही. पोलीस स्वतःचा जीव धोक्यात घालून सर्वांना घरात थांबण्याची सूचना करत आहेत. अशी सूचना करता करता पोलीस टीम आमच्या वसाहतीत शिरली. रस्त्यावर गर्दी नव्हती पण भाजीपाला विकणाऱ्या रमाकाकू भाजी विकत होत्या पण उन्हामुळे त्यांना चक्कर आली आणि त्या खाली कोसळल्या. एका पोलीस दादाने हे पाहिलं आणि त्यानं इतर पोलिसांच्या मदतीने रमाकाकूंना सावलीत नेलं. त्यांना पाणी पिण्यास दिलं आणि जवळच्या दवाखान्यात नेलं. खरोखर या प्रसंगातून वर्दीमधील माणुसकी दिसून आली.