Vasudha Naik

Others

2  

Vasudha Naik

Others

वृद्धत्व/जेष्ठत्व

वृद्धत्व/जेष्ठत्व

1 min
166


  *जेष्ठ व्हावे म्हातारे नाही.कारण म्हातारपण हे इतरांचा आधार शोधते,तर जेष्ठत्वामुळे इतरांना आधार मिळतो.*

   *जेष्ठांना समाजात मानसन्मान मिळतो.पण म्हातारी माणसं अडगळीचे सामान होवून जातात.*

   *पण म्हातारं माणूस घरी असले की घराला एक वेगळेच घरपण असते.संस्कार असतात.लहानमुलांची उत्तम जपणूक होते.घराला बाहेर जाताना कुलूप घालावे लागत नाही. घरची स्त्री जर नोकरी करत असेल तर घरातील घरपण टिकवण्याचे काम वृद्ध माणसं करतात.घरआवरण्याचं काम करतात.त्यांचा मुलांना व घराला आधार असतो.*

   *जेष्ठाने,कनिष्ठाने हे जाणले पाहिजे.तरच वृद्धांना मानसन्मान मिळेल.*

  *नाहीतर आहेच वृध्दाश्रमात रवानगी.पण अहो,आपणही वृद्ध होणारच आहोत ना!तर आपण आपल्या वृद्धांची काळजी मनापासून घेतली तर आपली मुलेही पुढे आपली घेतील न.*

  *सर्वांनी लक्षात ठेवावे 'आपणही एक दिवस जेष्ठाकडून वृद्धत्वाकडे झुकणार आहोत.तर समाजात मिळालेला मान व घरात मिळणारा मान याचे मानपमान न पाहता...आपले चांगले कर्म करत जावे,करत जावे,करत जावे....याचे फळ उशिरा का होईना..पण मिळतेच हे लक्षात घ्यावे.*


Rate this content
Log in