End of Summer Sale for children. Apply code SUMM100 at checkout!
End of Summer Sale for children. Apply code SUMM100 at checkout!

Shraddha More

Others


5.0  

Shraddha More

Others


वनराई…🌿🌱

वनराई…🌿🌱

3 mins 642 3 mins 642

जंगले आपल्याला अगदी प्राचीन काळापासून उपयोगात आली आहेत. अश्मयुगीन काळातही माणसाचे राहणे, खाणे-पिणे सगळे काही जंगलातच असायचे. त्यांना खाण्यासाठी लागणारी कंदमुळे जंगलातच मिळायची. यावरून समजते की अगदी प्राचीन काळापासून आपल्यासाठी जंगले उपयुक्त ठरली आहेत. सगळ्याप्रकरचे निसर्गसोंदर्य आपल्याला जंगलात पाहायला मिळते. वेगवेगळ्या प्रकारची झाडे, रंगीबेरंगी फुले, सर्वत्र हिरवळ पसरलेली असते. पक्ष्यांचे कर्णमधुर आवाज, पानांची सळसळाट, मोकळी हवा. डोक्यातले सगळे विचार बाजूला सारून मन शांत करणारा असा निसर्गाचा खजिना.


आजच्या काळात हे जंगलाचे वर्णन फक्त मुखोद्गत व्यक्त होतात पण हाच निसर्गाचा खजिना टिकवण्याचा कोणी प्रयत्नच करत नाही आहे. आजच्या काळात मात्र जंगलाची अनियंत्रित तोड चालू आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे हिरवळ वनराईत प्राण्यांचे राहणीमान हिसकावून त्यावर स्वतःची सिमेंटची जंगले उभारली जात आहेत. मग मला सांगा या मुक्या प्राण्यांनी जायचं तरी कुठे…? शहरं जंगलात घुसली आणि प्राणी शहरात शिरले आणि मग टीव्हीवर बातमी झळकते शहरात बिबट्याचा वावर, शहरात बिबट्याचा हल्ला. मग पुन्हा प्राण्यांनी हल्ला केला म्हणून प्राण्यांना ठार मारायचे. यात त्या प्राण्यांचा काय दोष… माणूस परक्या माणसाला स्वतःच्या दरातही उभं करत नाही. इथे तर तुम्ही सरळ त्यांच्या घरातच शिरताय. या मुक्या प्राण्यांना बेघर करण्याचा आपल्याला काय अधिकार आहे…?


आपण जंगले तोडतो कशासाठी? तर आपल्याला राहायला पुरेशी जागा मिळावी यासाठी. आपण जंगले तोडून माणसाला राहण्यासाठी मोठमोठ्या इमारती उभारू, सगळे लोक राहू शकतील इतक्या इमारती उभारू. पण ज्यापासून आपण जगतोय तोच ऑक्सिजन झाडांबरोबरच नष्ट होऊन जाईल, आणि ऑक्सिजन नसेल तर माणूस राहूच शकत नाही. मग माणूसच नसेल तर त्या एवढ्या इमारतीत राहणार तरी कोण? मी काय सांगायचा प्रयत्न करतेय ते कळतंय का…? आता तर असंख्य वृक्षरोपणाचे उपक्रम राबवले जातात खरे पण इथे तर वृक्षरोपणाचा दिखावा करायचा, लक्षलक्ष वृक्ष लागवडीचा दावा करायचा. वृक्षारोपण करतानाचे सेल्फी काढायचे, बातम्या द्यायच्या, दर वर्षी वृक्षरोपन करायचे. मग ही झाड गेली कुठे…? आपण फक्त वृक्षारोपण करतोय. वृक्षसांवर्धन करतच नाही. वेगवेगळे घोषवाक्य तयार करतो, 'एकतरी झाड लावू मित्रा' पण प्रत्यक्षात काय करतो तर, 'हजारो झाड तोडू मित्रा' अशामुळे पर्यावरणाचे संतुलन राखले जाईल का…?


आता तुम्ही म्हणाल एक वृक्षाने काय होणार आहे. पण हेच एक वृक्ष एक वर्षात १५ लाखाचे ऑक्सिजन देते. ४० लोकांचे पाण्याचे रिसायकलिंग करते. एक झाडावर १०० पक्षी घरटे बांधून राहू शकतात. एक झाड १२ विद्यार्थ्यांना व्ह्या-पुस्तके उपलब्ध करून देऊ शकते. एक झाड १८ लाख जमिनीची धूप थांबवू शकते. तेच एक झाड माणसाला त्याच्या लहानपणीच्या बाबागाडीपासून आरामखुर्ची पर्यंत आणि म्हातारपणीच्या काठीपासून ते स्मशानापर्यंत लाकूड देते.


एक झाड काय काय करू शकते. अजूनही वेळ गेली नाही आहे. आता नाही तर भविष्यात कधीच नाही. भविष्यात तुमच्यामाझ्या सारखी मूल पाठीवर ऑक्सिजनची सिलेंडर घेऊन जाताना कसे दिसतील. असा कोणता स्रोत आहे जो ऑक्सिजन निर्माण करू शकतो? सध्याच्या आधुनिक जगात एखादवेळेस ऑक्सिजन निर्माण होईलसुद्धा पण तो किती घेणार? पण आयुष्यभर फुकट ऑक्सिजन देणाऱ्या झाडाचे महत्त्व कळतच नाही. तर मित्रांनो आपल्याला जंगल नाही उभारायचा पण एक झाड तर नक्कीच उभारू शकतो. प्रत्येकाने एक झाड जरी लावले तरी जंगल आपोआपच तयार होईल. मी अस नाही सांगत की दरवर्षी एक झाड लावा, पाहिजे तर तुमच्या संपूर्ण आयुष्यात एकच झाड लावा पण ते संपूर्ण आयुष्यभर जपा…


Rate this content
Log in