Shraddha More

Others

4.7  

Shraddha More

Others

अरे माणसा, कधी होशील माणूस…!

अरे माणसा, कधी होशील माणूस…!

2 mins
844


आपल्या सृष्टीची निर्मिती केली ईश्वराने, या सृष्टीला सुंदर घडवण्याचे कार्य केले ईश्वराने, याच सृष्टीत जीव निर्माण केला ईश्वराने म्हणजेच मानवाची निर्मितीही केली ईश्वराने. पण याच सुंदर सृष्टीची परिस्थिती बदलली मानवाने. देवाच्या निर्मितीत बदल घडवण्याचा प्रयत्न केला मानवाने. ईश्वराच्या प्रत्येक निर्मितीत, कार्यात मानवाने बदल केले. काही चांगले बदल तर घडवलेच पण त्याधिक वाईट बदल घडवले.

सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे गंगेसारख्या पवित्र नदीला त्याने अपवित्र केले. गंगा नदी पवित्र म्हणून या नदीत निर्माल्य विसर्जन करणे , मृत व्यक्तींचे अवशेष किंवा राख नदीत विसर्जित करणे, या पवित्र नदीत स्नान केल्याने आपण सर्व पापातून मुक्त होतो अशा गैरसमजामुळे वर्षभरात सतराशे साठ पाप करून नदीत स्नान करणे यासारखी अयोग्य आणि लज्जास्पद कृत्य माणूस करतो. आणि तेच पाणी गंगाजल म्हणून वापरतात. लोकांनी स्नान केलेलं, मृतांचे अवशेष विसर्जित केलेलं पाणी शुद्ध कस असू शकत. या कारणांमुळेच नदी दूषित होऊन अपवित्र झाली आहे.

माणूस चांगला बदल घडवून आणण्यासाठी वाईट कृत्य करत आहे. स्वार्थी वृत्तीमुळे स्वतःच्या राहण्याच्या सोयीसाठी पशु-पक्ष्यांचा निवारा हिसकावून म्हणजेच वृक्षतोड करून , जंगलाची नासधूस करून उंच उंच इमारत्या बांधतो. फक्त पैसा कमवण्यात मग्न होऊन आरामगृह सुरू करून आराम करतो.

स्वतःच्या फायद्याचा विचार करताना जगातल्या सुंदर निर्मितीचे नुकसान होत आहे हे माणसाच्या लक्षातच येत नाही. तंत्रज्ञानाची निर्मिती करून माणसाने अनेक कार्ये उत्तमरीत्या पार पडली आहेत . पण त्याच तंत्राचा अति वापर करून पर्यावरणाचे संतुलन बिघडवत आहे. त्याने फक्त वृक्षतोड जरी केली तरी त्याचे परिणाम अनेक आहेत.

हे सर्व कृत्य करण्यात माणूस इतका हरपून गेला आहे की आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडीकडे लक्ष द्यायला त्याला वेळच मिळत नाही. रस्त्यावर एखादा अपघात झाला तरी तो माणूस स्वतःच्या स्वार्थापोटी त्याकडे दुर्लक्ष करतो. एखादी वयस्कर व्यक्ती रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत आहे असे बघूनही न बघितल्यासारखं माणूस डोळस असूनही अंध व्यक्तिप्रमाणे वर्णन करतो. आपल्यातलं माणूसपण बाजूला सरसावून ठेवतो.

स्वार्थात माणूस इतका बुडून गेला आहे की त्या माणसातला माणूसच हरवत चालला आहे. त्यातील माणुसपणच हरवलं आहे. त्यासाठी त्याने आपल्या विचारशक्तीला योग्य चालना दिली तर माणसात थोडाफार बदल होईल. नाहीतर नेहमीच बोलावं लागेल, अरे माणसा माणसा, कधी होशील माणूस…?!


Rate this content
Log in