Shraddha More

Others

5.0  

Shraddha More

Others

👫…मैत्री…👫

👫…मैत्री…👫

3 mins
451


सुख-दुःख वाटणारा.. संकट प्रसंगी मदतीला धावणारा... विवाहाच्या दिवशी मिरवणुकीत खांद्यावर घेऊन नाचनारा… आणि आयुष्याच्या संध्याकाळी तिरडीला खांदा देत समशानापर्यंत साथ देणारा… असा मित्र.


आयुष्याच्या प्रत्येक वाटेत एक नवीन वळण देणारा हा मित्र आपल्याला योग्यत्या दिशेला घेऊन जातो. आपण पाहिल्यांदा शाळेत जातो, तिथे आलेल्या आपल्यासारख्या इतरांना पाहतो. त्यांच्यातील ठराविक मुलामुलींशी आपण बोलतो. शाळेच्या मधल्या सुट्टीत एकत्र डबा खातो, मस्ती करतो, खिदळतो आणि तेव्हा पासून व्यक्तीच्या जीवनात मित्र नावाच्या पत्राची एन्ट्री होते आणि ती अधिकाधिक घट्ट होत जाते. कॉलेजमध्ये नवीन मित्र-मैत्रिणी, नवीन दिशा… कॉलेजची मैत्री, ही एक वेगळीच मजा देऊन जाते. प्रत्येकाचा एक कट्टा ठरलेला असतो. त्या ठराविक जागेवरच सगळे भेटतात. एकाने लेक्चर बंक केलं की सगळेच बाहेर पडून कट्ट्यावर जमतात. त्यांचा तो युवा कट्टा म्हणजे त्यांचं दुसरं घरच. त्या कट्ट्यावरच त्यांच्या गप्पा रंगतात.


मैत्री ही अगदी झाडासारखी असते. एक छोट्या रोपाला मित्र-मैत्रिणींच खत-पाणी घातलं तर त्याच भक्कम बहरलेलं झाड होत आणि त्याची मुळं इतकी खोलवर रुतलेली असतात की कोणीही कितीही प्रयत्न केला तरी ते उखडून काढू शकत नाही. याला फक्त योग्य त्या मित्रमैत्रिणींच्या खतपाण्याची गरज असते. खत (मित्र) जितकं उत्तम तितकच झाड भक्कम. पण चुकून जरी झाडाला चुकीचं खत मिळालं तर संपूर्ण झाड कोमेजून जात.


आजच्या पिढीमध्ये मैत्री खोलवर रुजलेली आहे. पूर्वी मैत्री करण्यासाठी तितकेसे स्वातंत्र्य नव्हते. आजच्या पिढीला ते स्वातंत्र्य मिळाले आहे आणि तरुणाई त्याचा उपभोगही घेत आहे. आजकाल मुलामुलींमध्ये निकोप आणि निखळ मैत्री पाहायला मिळते. समाजानेदेखील त्यांच्या मैत्रीला बऱ्यापैकी मान्यता दिली आहे. पूर्वीसारखं आता कोणालाही मैत्री करण्यासाठी वयाचं किंवा जातीचं बंधन नसतं. पूर्वी कामाच्या व्यापात मित्रांना भेटणे कठीण जायचे. त्यांच्याशी संपर्क करण्यासाठी पत्राचा वापर करावा लागायचा. याद्दठी बराच वेळ खर्ची व्हायचा. पण सध्या मित्रमैत्रिणींशी संपर्कात राहण्याचे बरेच पर्याय उपलब्ध झाले आहेत. फेसबुक सारख्या सोशल नेटवर्किंग साईट्समुळे मित्रपरिवाराशी सहजपणे संपर्कात राहता येतं.


मैत्री केवळ आनंद आणि समाधान देण्यासाठी नसते तर मैत्रीतून बरच काही शिकायला मिळतं. त्यामुळेच मैत्री ही आयुष्याचं सर्वस्व ठरते. आयुष्यातली सगळी नाती आपल्याला जन्मापासूनच मिळतात. पण मैत्री हे एकच नातं असतं जे आपण आपल्या इच्छेनुसार निवडू शकतो. हे एकच नातं निवडायला आपल्याला पूर्ण वाव मिळतो. त्यामुळे आपला मित्र कसा असावा हे ठरवता येतं. मैत्री ही खूप छान भावना आहे. मैत्रीला काळाची, वेळेची, वयाची बंधनं नसतात. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत कुणाशीही घट्ट मैत्री होऊ शकते. मैत्री जितकी जुनी आणि घट्ट होते तितकीच ती नाजूक होत जाते.


मैत्री ही अशी व्याख्या आहे जी कोणत्याही गोष्टीतून व्यक्त केली जाऊ शकते. प्रत्येकासाठी मैत्रीचं प्रतीक हे वेगळंच असतं.


कोणासाठी मित्र म्हणजे शेंगदाणे…शेंगदाणे जसे मातीत रुतलेले असतात तसेच मित्र हे घट्ट रुतलेले असतात. शेंगदाणे जसे आपल्या शरीरासाठी पौष्टिक असतात तसेच मित्र हे आपल्या आयुष्यासाठी पौष्टिक असतात.


कोणासाठी मित्र हा कांद्यासारखा असतो. कांद्याला जसे एकावर एक लेयर्स असतात तसेच मैत्रीला सुद्धा वेगवेगळे लेयर्स असतात. जसा कांदा आपल्या डोळ्यातून पाणी आणतो तसच मित्र सुद्धा आपल्याला कधीकधी भावूक करून रडवतात. आपली दृष्टी स्वच्छ करतात. एखाद्याला चक्कर वगैरे आली की कांदा हुंगवतात, तसच आपण आयुष्याच्या वाटेवर कुठे पडलो तर आपले मित्र आपल्याला कांद्यासारखे सावरतात आणि योग्य वळणावर आणतात. प्रत्येक पदार्थात कांदा हा हवाच असतो. कांदा नसेल तर त्या पदार्थाला फारशी मजा येत नाही. तसच मित्र हे प्रत्येक प्रसंगात गरजेचे असतात. ते नसतील तर त्या प्रसंगाची मजाच राहत नाही.


कोणासाठी मैत्री म्हणजे लिंबासारखी… लिंबू कसा अगदी टवटवीत असतो, तशी मैत्री सुद्धा टवटवीत आणि फ्रेश असते. लिंबामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते, तसच आपले मित्र आपल्याला बाहेरच्या वाईट आजासारख्या लोकांपासून वाचवायला मदत करतात.


कोणासाठी मैत्री म्हणजे शेव… शेव कशी एखाद्या पदार्थाला आकर्षक बनवते. त्या पदार्थाची चव वाढवते. तशीच मैत्री ही आपल्या आयुष्याची शोभा वाढवते आणि एक वेगळीच चव घेऊन येते.


कोणासाठी मित्र हे कुरमुऱ्यांसारखे असतात… कुरमुरे शरीराला बाधत नाही. त्रास देत नाही. उलट पोट भरल्याचा आनंद मिळतो तेही कमी खर्चात. मित्र देखील कुरमुऱ्यांसारखे हलके -फुलके असतात. त्यांचा कधी त्रास होत नाही.


कोणासाठी मित्र म्हणजे एखादं पात्र किंवा पातेलं असतं… म्हणजे कुरमुरे, कांदा, शेंगदाणे, शेव, लिंबू या सगळ्यांना एकत्र करून, धरून ठेवणारं पात्र. त्याला कितीही धक्के दिले तरी त्यातून एकही पदार्थ पडू न देणारं पत्र…


थोडक्यातच काय तर मैत्री ही एक भेळ सारखी असते. या सगळ्या आंबट, तिखट अशा निरनिराळ्या चविसारख्या मित्रांना एकत्र करून अगदी चविष्ट, पौष्टिक, कमी खर्चिक, उपभोक्त्त आनंद देणारी अशी भेळ.........


Rate this content
Log in