Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Shraddha More

Others


4.8  

Shraddha More

Others


अंधार...

अंधार...

3 mins 716 3 mins 716

अंधार म्हटलं की डोळ्यासमोर असतो तो फक्त काळोख. जाणवतो तो फक्त आवाज, इतरांची हालचाल आणि वस्तूंचं अस्तित्व. आपल्या आयुष्यातील फक्त दोन मिनिटं डोळ्याला पट्टी बांधून एक अडगळीच्या खोलीत ठेवलं तरी आपण कमीत कमी दहा वेळा तरी धडपडूच. पण या जगात अस कितीतरी जण आहेत जे जन्मतः डोळ्याला पट्टी लावून असतात. जन्मतः अंध असतात. त्यांना तर संपूर्ण आयुष्यभर त्या अंधारातच जगायचं असत. त्यांच्या डिक्शनरी मध्ये एकच रंग असतो तो म्हणजे : काळा… सर्वाधिक अंध संख्या आपल्या भारतात आहे. या जगात जवळपास 37 मिलियन माणसं अंध आहेत. त्यातील 15 मिलियन भारतीय. एक व्यक्ती फक्त २ मिनिटाच्या कालावधीत जर इतक्या वेळा धडपडत असेल तर विचार करा या 15 मिलियन अंध व्यक्तींचे काय होत असेल.

एखाद बाळ जन्माला आल्यानंतर संपूर्ण जग न्याहाळत असत. आपल्या आजूबाजूला असलेल्या वस्तूंकडे , व्यक्तींकडे त्याच लक्ष असत. या इवल्याशा डोळ्यात त्याने खूप काही सामावून घेतलं असतं. विचार करा ज्या बाळाला यातलं काहीच दिसत नाही पण कानावर खूप आवाज येतात, सतत आजूबाजूला काही असल्याचं फक्त जाणवत, पण कळत काहीच नाही. त्या आईवडिलांची काय मनःस्थिती असेल तेव्हा. सर्वसामान्य घरात बाळाला कोणत्या शाळेत घालायचे, त्याची रूम कशी सजवायची यावर विचार सुरू असतील तर त्यावेळी अंध बाळाच्या घरी आपण सजवलेली रूम बाळाला कशी समजवायची याचा विचार सुरू असेल. कसे सावरत असतील ना ते स्वतःला… त्या बाळाचं स्वतःचाच एक वेगळं विश्व असत. देवाने त्याची दृष्टी जरी काढून घेतली असली तरी इतर गोष्टी मात्र भरभरून दिलेल्या असतात, अगदी सर्वसामान्य माणसांना लाजवेल इतक्या… त्यांची स्मरणशक्ती खूप उत्तम असते. एकदा का एखादी गोष्ट सांगितली की त्यांच्या मेंदूच्या कप्प्यात अडकलीच म्हणून समजा. त्यांची स्पर्श करण्याची, समजून घेण्याची कला सर्वसामान्य माणसांना सुद्धा जमणार नाही. एका स्पर्शवरून ते माणूस ओळखतात, वस्तू समजून घेतात.

लुईस ब्रेल यांनी अंध व्यक्तींसाठी ब्रेल लिपीचा शोध लावला. जी अंधांना लिहिण्या-वाचण्यासाठी मदत करेल अशी भाषा. ब्रेल यांनी लावलेल्या शोधा मुळे या लिपीला ब्रेल असे नाव देण्यात आले. ब्रेल लिपीमुळे अंधांना खूप मदत होते. अंध मुलांच्या शाळेत त्यांना याच पद्धतीत शिकवले जाते. अंध व्यक्ती सर्वसामान्यांच्या बरोबरीने येऊन प्रत्येक क्षेत्रात उत्तम कामगिरी करत असतात. त्यांना इतक्या सोईसुविधा असतात याचा अर्थ त्यांचं आयुष्य इतकं सरळ-साधं नक्कीच नसत. प्रत्येक गोष्टी न पाहता करणं याचा विचार सुद्धा करवत नाही.

त्यांचं जगणंच खूप वेगळं असत. काही दिसत नसून सुद्धा ते सर्व काही बघत असतात. सर्वसामान्य माणूस जी गोष्ट डोळ्यांनी पाहतात तीच गोष्ट अंध व्यक्ती अंतःमनाने पाहतात. तेही आपल्यापेक्षाही अधिक बारकाईने. जी गोष्ट आपल्याला दिसत नाही अंध व्यक्तींना ती सहजच जाणवते. 'मात अंधारावर' या पुस्तकात 'जेकब बोलोटिन' नावाची अंध व्यक्ती डॉक्टर झाल्याचं स्पष्ट केलंय. जर एखादी अंध व्यक्ती डॉक्टर होत असेल तर यावर पूढे काहीही बोलणं चुकीचेच ठरेल. त्या व्यक्तीला त्याच्या सर्व पेशंटची नावं, त्यांना झालेले आजार हे सर्व बोलोटिन याना तोंडपाठ होत. समोर ओळखीची व्यक्ती आली की लगेच ते नावाने उच्चारत. एक सर्वसामान्य माणसालाही अवघड असणाऱ्या कितीतरी गोष्टी त्यांनी खूप मेहनतीने करून दाखवल्या आहेत.

असे कितीतरी अंध असतात ज्यांना बोलताही येत नाही त्यांना किती त्रास होत असेल. आपल्या देशात कितीतरी बलात्कार होतात. एका शोमध्ये अंध मुलीवर बलात्कार झालेला दाखवला गेला. जर असाच कोणत्या अंध मुलीवर बलात्कार झाला आणि तिला बोलताही येत नसेल तर काय करेल ती मुलगी… आपल्या समोर कोण आहे , किती माणसं आहेत, कोण काय करतय, कोण फोटो काढतय किंवा अजून काय… कस कळेल तिला. आवाज नसल्याने आरडाओरडा सुद्धा करता येणार नाही . काय अवस्था होईल तिची… कस सामोरी जाईल या सगळ्याला. यापेक्षा वाईट उदाहरण नक्कीच नसेल.

जास्त काहिनाही पण आपण यांना मदत म्हणून नेत्रदान नक्कीच करू शकतो. त्यासाठी काय जिवंतपणी तुम्हाला तुमचे डोळे कोणाला द्यायचे नाही. आपल्या मृत्यूनंतर तसेही आपले डोळे आपल्या कामाचे नाहीत. पण जर आपल्या मृत्यूनंतर कोणाला आपण उपयोगी पडत असू तर काय हरकत आहे मदत करायला. आपण जगात नसलो तरी कोणाच्या नजरेत आपण आहोत हे समाधान नक्की असेल. निदान जाता-जाता कोणाला मदत केल्याचं पुण्य तरी नक्की मिळवून जाऊ.…


Rate this content
Log in