Shraddha More

Others

5.0  

Shraddha More

Others

🎑..जादूचा दिवा..🎑

🎑..जादूचा दिवा..🎑

3 mins
745


जादूचा दिवा म्हटलं की आठवतो तो लहानपणीच्या गोष्टीतला अल्लाउद्दीनचा जादूचा दिवा असा जादूचा दिवा जो आपल्या इच्छा क्षणार्धात पूर्ण करतो. क्या हुकुम मेरे आका...?! असा आवाज आला की, अपना हुकूम सर आँखो पर ! हा जादूचा दिवा आपल्या इच्छा पूर्ण करतो, हट्ट पुरवतो, आपल्याला जे पाहिजे ते आपल्यासमोर हाजीर करून सतत आपल्याला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो. आपलं अडलेलं काम सहजरित्या सोप्प करतो.

      बालपणीच्या गोष्टीतला हा दिवा आयुष्यातले अनेक जादूचे दिवे दाखवून गेला. आपल्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा जादूचा दिवा म्हणजे आपली आई. जादूच्या दिव्यातल्या जिनप्रमाणे आईच्या गर्भातून आपण जन्म घेतो. प्रत्येक जण आपल्याला जीन चा एकच प्रश्न विचारतो, क्या हुकूम मेरे आका…!आणि इथूनच आपला जादूचा दिवा सुरू होतो। शाळेत गेल्यावर गोष्टीतला जादूचा दिवा आहेच. जस जसे आपलं वय वाढत जात तस तसे आपल्या आयुष्यातले जादूचे जादूचे दिवे वाढतच जातात. लालबागच्या राजाची शान आणि महाराष्ट्राचा मान असलेली मुंबई म्हणजे लखलखीत चकाकणारा असा जादूचा दिवा आहे. सतत पळत असणारी, कधीच न थकणारी, अशी धावती मुंबई प्रत्येकाच्या आयुष्याची जादू करते. कोणत्याही ठिकाणाहून अगदी रिकामी हातांनी आलेल्या माणसाला सुद्धा मुंबई कधीच एकट सोडत नाही. मुंबई कडे काही मनापासून मागितलं की जादुसरखी ती गोष्ट पूर्ण करते. या मुंबईत कोणताच माणूस उपाशी राहू शकत नाही. गावावरून आलेल्या प्रत्येक माणसाला मुंबईत स्थान मिळवून देते ही मुंबई, हक्कच घर मिळवून देतो ही मुंबई. कष्ट करायला, मेहनतीने धावायला आणि महत्त्वाच म्हणजे जगायला शिकवते ही मुंबई. शक्य नसणारी गोष्ट सहज शक्य करून दाखवते ही मुंबई. अशी ही जादूचा दिवा असलेली मुंबई…!

      आजच्या तरुण पिढीला तर नवीनच जादूचा दिवा सापडलाय, "टेक्नॉलॉजी..!". आपल्याला कोणताही प्रश्न पडला असेल की लगेच टेक्नॉलॉजिला आदेश करून एखाद्या जादुसारखा लगेच तो प्रश्न सोडवता येतो. कोणत्याही विषयाची, व्यक्तीची माहिती मिळवता येते. आपलं काम सहजरित्या करून जाते ही टेक्नॉलॉजी. भांडी-कपडे यासाठी टेक्नॉलॉजी, चपात्या करायच्यात टेक्नॉलॉजी, अभ्यास होत नाही आहे टेक्नॉलॉजी, नोकरी मिळत नाही आहे टेक्नॉलॉजी, भूक लागलीय, काही खायला मागवायचय टेक्नॉलॉजी, फिरायला जायचय टेक्नॉलॉजी, टेक्नॉलॉजी…टेक्नॉलॉजी…आणि फक्त टेक्नॉलॉजिच…!

      एखाद्याला त्याची आवड, त्याचा छंद म्हणजेच जादूचा दिवा…कोणाला कबड्डी, तर कोणाला क्रिकेट ! मैदानात उतरताच जादू करून जातो हा दिवा. ही एक आवड, हा जादूचा दिवा त्याच्या आयुष्यात त्याला हवासा असणारा आनंद देतो, समाधान देतो. एखाद गाणं नकळत आपल्या मनात जादू करून जात. एखाद नाटक आपल्याला खूप काही शिकवून जात. एखादी कविता एखाद्या जादूसारखी आपल्या जीवनाची शैली सांगून जाते.

      कोणतंही नातं जादूच्या दिव्यापेक्षा कमी नाही. आई-बाबा म्हणजे आयुष्य चमकवणारा जादूचा दिवा. लहानपणापासून जी गोष्ट मागितली, ती दुसऱ्या क्षणी आपल्यासमोर असते. आपले प्रत्येक हट्ट पुरवणारा, काय हवनको ते बघणारा, आपल्याला कोणत्याही प्रकारचे कष्ट होऊ नये यासाठी धडपडणारा आपला बाबा आपला जादूचा दिवा…! आपल्या कामात आपल्याला मदत करणारी, प्रत्येक गोष्ट पुढ्यात आणून ठेवणारी, तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारी आपली आई आपला जादूचा दिवा…! कधी हसणारी - कधी रुसणारी, कधी धडपडणारी - कधी शहारलेली, एखाद्या शब्दाने दुःखावणारी, धावपळीच्या जगात आपल्याला मायेने कुशीत घेणारी - आपल्याला सावरणारी, स्वावलंबी होऊन जगायला शिकवणारी, हट्टाला पेटून उठणारी, बेभान होऊन खेळवणारी, आयुष्याला नवीन वळण देणारी, जगण्यात एक वेगळी मजा आणणारी, जगण्यातला खरा आनंद शिकवणारी अशी मैत्रीदेखील आपला जादूचा दिवाच असते…!

      थोडक्यातच काय, तर संपूर्ण जग , आपल्या आजूबाजूचा परिसर, आपल्याला भेटणारी विविध तऱ्हे-तऱ्हेची माणसं, अर्थातच आपलं संपूर्ण आयुष्य म्हणजेच आपला सुंदर आणि गोष्टीपुरता मर्यादित वाटलेला असा जादूचा दिवा प्रत्येक्षात आपल्या हातात असतो. 

      मग तुमच्याकडे आहे की नाही असा जादूचा दिवा……!


Rate this content
Log in