Ishwari Shirur

Others

3.3  

Ishwari Shirur

Others

वलय...!

वलय...!

2 mins
3.1K


आज सहजच आठवली ती सांज. आठवणार का नाही; पहा तरी हा हिरवा शालू, जरतारी काठ मनाच्या लहरींना भेदून, स्पंदनांची सर्व दारे मोकळी करुन अगदी उत्कंठाने त्या आठवणी जशास तशा नजरेसम उभी करतो. खरं तर हा शालू, ही साडी केवळ निमित्तच म्हणावे. पण तो दिवस.... प्रत्येक मुलीच्या आयुष्यात असा एक दिवस येतोच. आणि आकलनापलीकडचं ईमान" म्हणजचे आई होण्याचं तीच स्वप्न हळूहळू आकार घेऊ लागतं. सगळ्यांनाच हवीहवीशी वाटणारी गोड बातमी अलगद कानावर येते. आकाश ठेंगणं वाटू लागतं आणि तिच्यासोबत सगळ्यांच्या मनात आनंद, उत्साहाचे वारे वाहू लागतात.


रंग, रुप न पाहताच खुलणारं हे प्रेम सातव्या महिन्यात आपल्या आईला आपल्या येण्याची सतत चाहूल देत असतं. स्वप्नं फ़ुलतात, डोहाळे लागतात, इवलीशी पावले चाहूल देऊ लागतात. आपल्या बाळाच्या अस्तित्वाची ही पहिली खुण; म्हणजेच डोहाळ जेवण. डोहाळ जेवणाच्या निमित्ताने गर्भवती महिलेचं सर्व कुटुंबियांकडून आणि मित्रपरिवारांकडून कोडकौतुक करण्यात येतं. शिवाय जिभेचे नानाविध चोचलेहीे पुरविले जातात. संपूर्ण वातावरण कसं आल्हाददायक असतं. 'बर्फी की पेडा' अशी थट्टा करुन नवखं पाऊल येण्या अगोदरच त्याच्या आगमनाची तयारी सुरू होते.


अशाच प्रकारे आई स्वतःपेक्षा जास्त आपल्या बाळाला जपण्यात व्यस्त असते तर बाळाची आजी आपल्या नातूला धष्टपुष्ट बनविण्यासाठी डिंकगुळाचे लाडू करण्यात व्यस्त असते. बाबाच्या मनात मात्र देशाच्या अर्थव्यवस्थेप्रमाणे गुंतागुंत झालेले अनेक विचारांचे कोंब सुरपारंब्या खेळत असतात. कोणत्या शाळेत दाखल करायचे? डबल ड्युटी करावी लागेल का? शेवटी काय तर प्रत्येक मुला बाळांचा सिक्रेट लव्हर हा त्यांचा बाबाच असतो. असो... आज एवढ्या वर्षाने हे सर्व अस्खलित आठवतयं हे नवलच आहे. खरच नावाला फक्त साडी असली तरी बर्‍याच गोड आठवणींचा खजिना आहे हे बोलणं काही वावगं ठरणार नाही. 


Rate this content
Log in