Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Ishwari Shirur

Others


3  

Ishwari Shirur

Others


कलाकुसरींनी वेड लावलं..!

कलाकुसरींनी वेड लावलं..!

2 mins 20 2 mins 20

सध्या चौफेर चर्चेत असलेला ज्वलंत विषय म्हणजे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव. जगभर राज करीत असलेल्या या महाभयंकर विषाणूने सर्वत्र नकारात्मकता पेरली असताना सकारात्मकतेचे अंकुर खरंच तोंड वर काढेल का असा प्रश्न पडला होता. पण प्रश्नातच उत्तर असते हेच काय ते त्रिकालाबाधित सत्य. या लॉकडाऊनच्या काळात मला स्वतःसाठी मिळलेला हा वेळ म्हणजे माझ्यासाठी सुवर्ण संधीच ठरली आहे. धकाधकीच्या दिनक्रमात अपुर्ण राहिलेल्या बर्‍याच गोष्टींना आज नव्याने आकार देता आला. माझ्यात दडलेल्या सुप्त कलाकुसरींनी तर आता चांगलाच वेळ व्यतीत होत आहे. वेगवेगळ्या रंगछटा कागदावर उमटून तयार होणारी चित्राकृती सकारात्मकतेची एक वेगळीच उर्जा देऊन जाते. गेल्या काही वर्षांपासून चित्रकारी किंवा ओरिगामी चा हा छंद कुठेतरी हरवला होता. पण लॉकडाऊनने घरात कैद केल्यामुळे या छंद वजा कलांना चांगलाच बहर आला आहे. तसेच कधी तरी क्वचित उलगडणारे शब्दांचे गाठोडे या लॉकडाऊन मुळे आजकाल दररोज न चुकता लेखणीतून उमलताना दिसतं आहे. लॉकडाऊन मुळे माझ्या लेखणीला प्राप्त झालेलं हे तेज जणू सकारात्मकतेचं वटवृक्षचं बनलं आहे असे म्हटले तरी आता काही वावगे ठरणार नाही. खर तरं हिच खरी वेळ आहे आपल्यातल्या कलाकाराला रंगवण्याची. हा आता जिवश्य कंठश्य अशा आप्तजणांशी ची भेट होत नसल्याचं दुःख तर प्रत्येकांना असणारच; पण त्यातही एक वेगळीच मजा आहे. ते म्हणतात ना एखादी गोष्ट आपल्या पासून दूर गेली की त्या गोष्टीचं महत्त्व आपल्याला जास्त कळतं. तसेच काही महत्त्व मला देखील या लॉकडाऊनमध्ये कळाले. शिवाय सगळ्यात जास्त सकारात्मक बाब अशी की घराला घरपण आलं. एकत्र जेवणाचा थाट आता रोजच मांडलेला असतो. लहानपणी केलेले अंतरंगी किडे, आजीचा पडलेला फटका या भुतकाळातील आठवणींनी मैफिल छान रंगून जाते. डोक्यात घालमेल करणारी अवास्तवी कल्पना कधीतरी सत्यात उतरावी असं नेहमीच वाटायचं. पण हेच अवास्तवी वाटणारं चित्र लॉकडाऊन मुळे प्रत्यक्षात अनुभवायला मिळत आहे. हा काळ तर कसोटीचा असला तरी उद्याचा सुर्य हा नक्कीच सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारा ठरेल; यात काही शंकाच नाही. 

"भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे."


Rate this content
Log in