विवेकबुद्धी
विवेकबुद्धी
विवेक एक साधारण घरातला मुलगा. त्याचे बाबा महेश यांचं किराणा मालाच दुकान, तर आई मनीषा ही गृहिणी.
विवेक त्यांचा मुलगा..एकटाच ना बहीण ना भाऊ.
त्याच्या आईची खूप इच्छा विवेकला एक तरी भाऊ किंवा बहीण असावी. पण महेश (विवेक चे बाबा) चा एकच हट्ट... एकच ठीक आहे. अग शिक्षण किती कठीण झालंय, किती खर्च लागतो... एकालच उत्तम शिक्षण द्यायचं... दुसऱ्या मुलाचा विचार सुद्धा नको.
मनीषा- अहो, सगळे आपल्या भाग्याने घेतात...
महेश- नाही...मला विवेकलाच चांगलं शिक्षण द्यायचं आहे, माझ्यासारखा नको व्हायला.
आम्ही पाच भाऊ, मी सगळ्यात मोठा, जबाबदारीच ओझं आलं, मी नाही शिकू शकलो.
पण विवेक च तसं नको व्हायला....
मनीषाला सुद्धा महेशच म्हणणं पटलं.
विवेक अभ्यासात हुशार, संस्कारी, दुसर्यांना मदत करण्यास नेहमी तत्पर.
प्रत्येक परिक्षेत त्याचा क्रमांक हा ठरलेलाच.
अश्यातच तो बारावी झाला. त्याने सरळ आर्ट घेऊन पदवीका पूर्ण केली.
आणि वेळ न गमावता स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागला. मुळातच खूप हुशार म्हणून तो लवकरच एकही वर्ष न घालवता पास झाला.
तो बँकेची परीक्षा पास झाला...आज त्याचा interview होता. आईबाबांच्या पाया पडून देवाला नमस्कार करून तो ऑटो ने मुलाखतीसाठी निघाला. 11 वाजता त्याला तिथे हजर व्हायचे होतें.
हे काय???
रस्ता पूर्ण जाम झालाय..….
आता त्याच्याकडे फक्त एकच तास होता... पण ट्रॅफिक जॅम असल्यामुळे त्याला पर्याय नव्हता.त्याच्या मनाची घालमेल चालली होती. ही त्याची पहिलीच मुलाखत....आणि त्यात हे असं!!!,
काय झालं असावं, म्हणून तो ऑटोतून खाली उतरला....
अरे बापरे!!!! एक चौदा, पंधरा वर्षाचा मुलगा सायकलने रस्ता ओलांडताना एका ट्रकवाल्याने त्याला मागून ठोस मारली..
मुलगा बेशुद्ध झालेला,डोक्यातून रक्तस्त्राव सुरू....लोकं व्हीडिओ काढण्यात मग्न...ट्रक वाला ट्रक सोडून पसार...कोणी मदत करण्यासाठी तयार नाही....
का???
तर पोलीस केस आहे म्हणून.कोण लफडयात पडेल?
विवेकच्याने हे पहावंले नाही.त्याने तो ज्या ऑटोतून जात होता, त्या ऑटोतून दवाखान्यात नेलं. तिथे सगळ्या
फॉरमालिटीज पूर्ण केल्या... त्याच्या बॅग मधून आयकार्ड काढून त्याच्या शाळेत आणि घरी फोन केला. त्याच नाव नचिकेत (कार्डवर) होत.
लगेच नचिकेतचे आई बाबा दवाखान्यात आले.
डॉक्टर साहेब, " काय झालं माझ्या मुलाला!! आता तो कसा आहे... आम्ही त्याला बघू शकतो का?
डॉक्टर- अहो , शांत व्हा आधी...
नचिकेत आता धोक्याच्या बाहेर आहे. दोन तासांनी तो शुद्धीवर येईल, त्यानंतर भेटू शकता त्याला.
-खूप खुप धन्यवाद डॉक्टर साहेब, तुमच्यामुळे आमचा नचिकेत आज आहे🙏
डॉक्टर- अहो , आभार माझे नाही त्यांचे माना... त्यांनी जर याला वेळेवर आणलं नसत तर...
विवेक आपल्या बाबांसोबत फोनवर बोलत असतो, घडलेलं सारं त्यांना सांगतो... बाबा सॉरी मी interview नाही देऊ शकलो...
इतक्यात नचिकेतचे बाबा तिथे येतात, ते विवेक च बोलणं ऐकतात....
त्याच्यस खांद्यावर हात ठेवून, "खूप खूप धन्यवाद तुझे🙏"
विवेक- त्यांचे हात धरून , " अहो आभार कसले, कर्त्यवच होत माझं ते...
नचिकेतचे बाबा- मी तुमचं बोलणं ऐकलंय...
तुझा interview होता ना आज...
विवेक- अ.. हो ..हो
पण त्यापेक्षा हे जरुरी होत..
एवढ्यात नर्स आली, नचिकेत शुद्धीवर आलाय, आपण त्याला भेटू शकता.
त्याचे आई बाबा त्याला भेटायला गेले. विवेक ही घरी आला.
विवेक ने आपल्या आई बाबांना सगळं सांगितलं.
महेश- अरे, interview परत होतील रे... आज तू खरंच खूप चांगलं काम केलं..त्याच फळ आज ना उद्या मिळेलच.
--------------------------------------
दुसऱ्या दिवशी सकाळीच खाकी वर्दीतला एक मनुष्य विवेकच्या घरी आला.
विवेक इथेच राहतात का?
विवेक- हो मीच विवेक...
काय काम आहे?
तो- साहेबांनी हा लिफाफा
पाठवलाय.. तुम्हाला दयायला सांगितलंय..
विवेक लिफाफा उघडतो....
अग आई, बाबा मला परत intetview कॉल आलाय..
आजच बोलावलंय...☺️
विवेक interview ला जातो, तो बसतो, तिथे कुणीच candidet नसतात.
तेवढयात ,विवेक आपणच ना...
सर आपल्याला आत बोलताहेत...
विवेक- May I Come In Sir
-- Yes... Come in..
विवेक त्या पाठमोऱ्या खुर्चीकडे बघतो..
लगेच खुर्ची turn घेते, आणी त्याला सरांचा चेहरा दिसतो...
अरे हे तर नचिकेतचे बाबा...
ज्याचा काल अपघात झाला होता..
विवेक- सर आपण इथे....
नचिकेत कसा आहे..
सर- तो आता बरा आहे.
खरतर तुझ्यामुळेच तो आज आहे.
आम्हाला तुझ्यासारख्या कर्तबगार मुलांची खूप गरज आहे.
You are selected....
असं म्हणून लगेच त्याला ऑफर लेटर दिल....💐💐
प्रिय वाचक वर्ग आवडल्यास नक्की like, comment करा.
चुका झाल्यास नक्की सांगा😊
नावासह Share करा ही नम्र विनंती🙏