विस्कटलेली नाती
विस्कटलेली नाती
*विस्कटलेली नाती*
नाती ही आयुष्याची सुंदर वीण असते.ती शक्यतो तुटत नाही.
विश्वास, प्रेम आणि समजूतदारपणावर ती टिकून राहतात. विश्वासघात केल्यावर मात्र ते तुटण्याची शक्यता निश्चितच असते.
अहंकार, गैरसमज आणि अपेक्षांच्या ओझ्यामुळे काही नाती विस्कटतात. मीपणा वाढला की नाती तुटतात.
मनातील संवाद हरवला की माणसं जवळ असूनही दूर जातात. व्हाट्सअप च्या या युगामध्ये सध्या मेसेज द्वारे बोलले जाते. हेही साधन तितके असे वाईट नाही मनातल्या भावना एक्सप्रेस करण्यासाठी हे साधन चांगले आहे परंतु आठवड्यातनं एकदा, महिन्यातून एकदा तरी किमान नातेवाईकांना फोन करावा म्हणजे फोन द्वारे आपल्याला शब्दांच्या फेकीवरून त्याचे दुःख किंवा आपुलकी कळते.
शब्दांचे घाव अनेकदा मनात खोल जखमा करून जातात.
नाती तुटतात तेव्हा फक्त माणसं नाही, तर आठवणीही रडतात.
आपण एकांतात बसल्यानंतर आपले मन भूतकाळात जाते आणि आपल्याला ज्या काही गोष्टी आठवतात त्या आठवतं असतातच आणि त्यानुसार आपल्या मनपटलावर परिणाम होतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे ज्ञात आहे. त्यासाठी वाईट गोष्टी सोडून द्याव्यात चांगल्या गोष्टींचा आधार घेऊन त्या आठवाव्यात म्हणजे आपल्याला त्रास होत नाही आणि नाती टिकवण्यासाठी हे एक उत्तम माध्यम आहे.टॉनिक आहे.
संयम, माफी आणि प्रेम यामुळे तुटलेले धागे पुन्हा जुळू शकतात.sorry आणि Thanks हे शब्द फार महत्त्वाचे आहे. ते आपल्या तोंडी कायम ठेवावेत.
नात्यांमध्ये जिंकण्यापेक्षा समजून घेणे अधिक महत्त्वाचे असते. समसुंदरपणा आपल्यामध्ये असेल तर शक्यतो नाती तुटण्याचा प्रसंग जास्त येत नाही. किंवा तुटत नाहीत. ती बांधून ठेवली जातात.
एक प्रेमळ शब्द अनेक दुरावे मिटवू शकतो.म्हणून नाती जपा, कारण तीच आयुष्याची खरी श्रीमंती असते.
*विस्कटलेली नाती*
नाती होती कधी फुलांसारखी
सुगंधाने भरलेली गोडुली
आज मात्र शांत वाऱ्यासंगे
विरहाची चाहूल जरा दाटली...
मनामनातील संवाद सारे
अचानक कुठे हरवून गेले
जवळ असूनही आपले माणूस
दुराव्याच्या वाटेवर का बरं गेले..
अहंकाराच्या उंचच उंच भिंतींनी
प्रेमाचे घर मोडून का टाकले
शब्दांच्या तीक्ष्ण या वारांनी
हळवे मन काहीसे जखमी केले...
तरीही आशेचा किरण कुठेतरी
मनात अजून जिवंत आहे बरं
प्रेम, माया, भावना,आपुलकीने,
नाते पुन्हा फुलण्याची आस आहे...
✍️ वसुधा नाईक, पुणे
