आठवणींची बरणी किंवा डब्बा
आठवणींची बरणी किंवा डब्बा
*आठवणींची बरणी किंवा डब्बा*
हो!बरोबर वाचले आपण आठवणींची बरणी किंवा डब्बा मलाही हा शब्द लिहिताना जरा मजा वाटल्याने आपण काय लिहित आहोत असे वाटले,पण लिहायचंच!हा मनाचा विचार आपण मांडावा असे मला वाटले.
आपण रोज खूप अनुभवातून जात असतो. चांगले,वाईट दोन्हीही अनुभव आपल्याला येतात. या अनुभवातून आपल्याला कधी आनंद होतो कधी खूप हर्ष होतो तर कधी दुःख होतं.
तर हा एक उपक्रम आपण राबवून बघूया असे मला वाटले.
या वेगळ्या उपक्रमासाठी लागणारे साहित्य काय आहे ते पाहूया...
उपक्रम - आठवणींचा डब्बा केव्हा बरणी
साहित्य - एक छानसा डब्बा अथवा बरणी, आपल्या आवडीचे पेन, आपल्याला आवडतील त्या कागदाचे वेगवेगळ्या आकारातील छोट्या चिठ्ठ्या.
उपक्रम कृती - दिवसभर आपल्याला आलेल्या अनुभवातून दोन चांगले व मनाला सुख देणारे आनंद देणारे असे अनुभव आपण त्या चिठ्ठी मध्ये लिहायचे आणि ती चिठ्ठी बंद करून त्या बरणीमध्ये अथवा डब्यामध्ये टाकायची. एक नियम इथे पाळायचा ज्या घटनेनं आपल्याला इजा झाली आहे मनाला दुःख झालेल आहे, आपल्या मनाला त्या गोष्टी पटल्या नाहीत त्या गोष्टी या चिठ्ठी मध्ये लिहायच्या नाहीत.
असे साधारण महिनाभर करायचे.
निरीक्षण - महिन्याभराने जेव्हा आपण एखाद्या गोष्टीनं खूप त्रासलेलं असू किंवा अतिशय मनाला दुःख झाले असेल त्यावेळेला हा डबा उघडायचा त्यातला एक,एक आठवणींमध्ये रमायचं आणि त्या रमलेल्या आठवणीमध्ये आपलं दुःख कधी विसरून जाऊ हे सुद्धा आपल्याला कळणार नाही तर हे झाले आपले निरीक्षण आपणच केलेले.
अनुमान - या उपक्रमाद्वारे आपण केलेल्या काही छान गोष्टींचे वाचन करून आपल्या मनाला जो आठवणींचा आनंद मिळणार आहे.तो जगात कुठेही मिळणार नाही.त्या आठवणी स्मरून आपण पुन्हा त्या आठवणींमध्ये रमत जातो आणि आनंद घेतो. आलेल्या दुःखाला आपण डावलतो निश्चितच.हा उपाय सर्वांनी करून पहावा मी स्वतः केलेला आहे त्यामुळे मला याच्यातून खूप आनंद मिळतो.
वसुधा नाईक, पुणे
मो. नं. 9823582116
