*सलोख्याचे नाते*
*सलोख्याचे नाते*
*सलोख्याचे नाते*
नंदा आणि नंदन एकाच गावी राहणारे. गावाचे नाव होते नांदगाव. लहानपणीपासून एकत्र राहिलेले. एकत्र वाढलेले. आणि एकाच शाळेत शिकलेले.
दोघांचे मैत्रीचे नाते अतिशय सुंदर आणि पवित्र होते. दोघांचे घरे सुद्धा जवळ जवळच होती.
दोघ आता आठवी पास होऊन पुढच्या वर्गात गेली.
नंदनच्या वडिलांना देवाज्ञा झाली. नंदनच्या कुटुंबाचा आधार गेला. नंदन हा त्यांच्या घरात मोठा असल्याकारणाने त्याच्यावर मोठा होऊन कुटुंब सांभाळण्याची जबाबदारी आली.
नंदनने तिथेच शिक्षण सोडले. आणि वर्तमानपत्र टाकायला लागला. इतरांच्या घरातली काम किरकोळ, किरकोळ काम करायला लागला..आणि एका ठिकाणी मजदूरी करू लागला व कुटुंबाचे पालन पोषण करू लागला.
इकडे नंदा स्वतःच्या घरी आरामात होती. जरी जवळ होते रहायला तरी आता त्यांची भेट मात्र होत नव्हती. कारण नंदन दिवसभर कामाला असायचा आणि ही शाळेत असायची.थोडेफार बोलणे होतं होते. पण पहिल्या सारखे बोलणे, एकत्र वेळ घालवणे जमत नव्हते.
नंदा कॉलेजला जायला लागली. बाकीची मुलं तिला त्रास देऊ लागली. दिसायला देखणी,अंगानं चांगली भरलेली,नाकीडोळी छानशी.. हे पाहून मुलं तिच्यावर भाळायला लागली. तिला या गोष्टीचा त्रास होऊ लागला.
आता मात्र तिला नंदनची आठवण झाली. आपण इतक्या वर्षे एकत्र आहोत पण तरीसुद्धा त्याने कधी या नजरेने आपल्याकडे पाहिले नाही.हे तिला जाणवायला लागले.
ती त्याच दिवशी नंदनला भेटायला त्याच्या घरी गेली. त्याला घेऊन बाहेर फिरायला गेली. आणि होत असलेला प्रकार त्याच्या कानावर घातला.मनातली गोष्ट सांगितली. तू मला आवडतोस. मला तुझ्याशिवाय करमत नाही.दुसरा कोणी नको.
नंदन बोलला "अग, मी असा कमी शिकलेला. छोटे छोटे काम करून घर कसतरी भागवतोय. तू मला सोडून दुसऱ्या कोणाचा विचार कर."
पण नंदाने काही ऐकले नाही. ती त्याला बोलली "तुला एवढंच म्हणायचं आहे ना! ठीक आहे,मी तुला आज पासून शिकण्यासाठी मदत करेन.कामतही मदत करेन."
ती त्याच्या आईला भेटते. आईच्या कानावर झालेला किस्सा घालते. नंदू आवडतो हे कबूल करते. आणि नंदनला पुढे शिकून कामाला हातभार पण लावणार आहे हे सांगते.
नंदनच्या आईला नंदा आवडते.तिची पाठ थोपटते. होकार देते.
इकडे नंदाच्या घरी जरी दोघांचा घरोबा होता, तरीसुद्धा आता नंदन पैशाने कमी आहे किंवा शिक्षणाने कमी आहे हे तिच्या आई-वडिलांना आवडत नाही.
तशी घरची परिस्थिती सुद्धा बेताचीच असल्याकारणाने आपल्या नंदाला तिथे देणे पटत नाही.विचार करू लागतात. तिच्यावर चिडतात.
नंदा ठामपणे आपल्या आई-वडिलांना सांगते "मी त्याचे शिक्षण पूर्ण करेन. त्याला मदत करेल.त्याच्या कामात मदत करेल,आणि मी घर पुढे आणून दाखवेल तेव्हा तरी तुम्ही मला त्याच्याशी लग्न करून द्यायला हवे."
नंदाचे आई-वडील सहजा सहजी तयार होत नाहीत.पण मुलीच्या हट्टापुढे त्यांचे काही चालत नाही व मुलीला परवानगी देतात आणि तिला मदतही करतात.
पाच, सहा वर्षातच दोघेही रात्रीचे कॉलेज करून डिग्री पूर्ण करतात.दिवसा काम करतात. आता चांगला पैसा कमवायला लागतात.
नंदाचे आईबाबा दोघांना उत्तम आशिष देतात. नंदूची आई तिला सून म्हणून स्वीकार करते. दोघे लग्न करतात.
आता नंदन स्वतःचा पेपरचा आणि प्रेसचा बिजनेस टाकतो. नंदा त्याच्या सोबतीने काम करते. हळूहळू त्यांचा प्रेसचा बिजनेस पण वाढीस लागतो..
काही वर्षातच दोघे चांगले बिजनेसमन होतात. शहरातील एक नामवंत कुटुंब म्हणून ओळखले जातात..
(एक सांगते - आपल्या मुलांचे पण ऐकून घ्या. त्यांना चांगल्या मार्गाची दिशा दाखवा.नाती घट्ट बनवा. सलोख्याची बनवा )
वसुधा वैभव नाईक, पुणे.
