Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published
Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published

Anita Gujar

Others


2  

Anita Gujar

Others


विचार

विचार

2 mins 456 2 mins 456

विचार आणि आचार एकरुप झाल्याशिवाय जीवन यशस्वी होऊ शकत नाही. माणूस हा विचाराने पुढे जाणारा असावा त्याला मार्ग सापडतो. जो विचार कमी करतो तो अधिक बोलतो. जो कमी बोलतो तो विचार अधिक करतो.


आपल्या विचारांची-भावनांची तीव्रता आपल्यालाच कळते. ते मग पुष्कळदा खरे असोत, भ्रामक असोत वा दिशाभूल करणारे असोत. काही काळ ते विचार, त्या भावना तुमच्यावर हुकमत गाजवून जातात हेच खरं. म्हणूनच त्यातली उत्कटता ज्याची त्याला जाणवते. इतरांना नाही.


तशा अर्थानं माणूस सतत एकटाच. आपल्या मनावर सतत चांगल्या विचारांचे संस्कार व्हायला हवे. अर्थात ते आपल्या आईवडिलांच्या संस्कारातून मिळालेलेच असतात. पण पुढे जगात वावरताना काही वेळेस आपल्या भावनांवर किंबहुना आपल्या षड्रिपूंवर ताबा न राहिल्यामुळे आपल्या हातून नकळत काही चुकीचे कर्म घडले जाते आणि ही गोष्ट ती घडून गेल्यानंतर कळते की अरे , मी चुकीचे केले.


आजकाल बहुतेक बरेच जण एखादा गुरू करतात, किंवा सत्संगाला जातात. अतिशय चांगली गोष्ट आहे ही, आपल्या मनाला सकारात्मकतेकडे वळवण्याचे कार्य हे गुरू किंवा सत्संगामध्ये केले जाते. शेवटी ज्याची जशी श्रद्धा तैसा नारायण. प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग आहे.


माझा या सर्व गोष्टींवर अजिबात आक्षेप नाही. उलट मला खूप आवडतात या सर्व धार्मिक गोष्टी. खंत कुठे वाटते तर तुम्हाला जे ज्ञान सत्संगामध्ये मिळते ते बरेच जण आचरणात आणत नाही. आज आपण सारे एक आहोत, कोणी लहान-मोठा नाही, कोणी उच्च-नीच नाही असे सांगूनही एखादी सासू आपल्या मुलाने परजातीची सून आणली म्हणून कायम तिचा दुःस्वास करत राहील, तर कधी शेजाऱ्यांच्या घरात काय शिजतंय हे सर्वांना कधी सांगते असे होणे, एखादी व्यक्ती स्वकर्तृत्वाने पुढे जाते तर तिच्याबद्दल मनात जेलस निर्माण होणे, सुनेला मुलगा न होता मुलगी झाली तर घराण्याला वंश नाही मिळाला म्हणून तिला जन्मभर कोसणे, अशा कितीतरी गोष्टी रोजच्या आयुष्यात घडतात पण स्वच्छ मनाने, मनाचा मोठेपणा दाखवून स्वीकार करायला हवे. हीच तर शिकवण मिळते ना आपल्याला या सत्संग मधून.


अहो, क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे. मग आधी स्वतः या गोष्टींचे आचरण अगदी आपल्या घरापासून करा म्हणजे बघा किती आत्मिक आनंद मिळतो तुम्हाला. आणि गंमत म्हणजे हा आनंद तुम्हाला कुठे बाहेर शोधण्याची गरज नाही तो तुमच्या मनातच असतो थोडे स्वतःला बदलून बघा आणि जीवनात आत्मिक आनंदाचा अनुभव घ्या...


Rate this content
Log in