Anita Gujar

Others

1  

Anita Gujar

Others

रंग जीवनाचे

रंग जीवनाचे

1 min
628


रंगाला माणसाच्या आयुष्यात खुप महत्व आहे . *तानापिहिनिपाजा* म्हणजे तांबडा,नारिंगी,पिवळा,हिरवा,निळा, पारवा (पांढरा) , जांभळा. पण  प्रत्येक मुळ रंगाचा आगळा वेगळा गुणधर्म त्यावरुन मानवी स्वभावला विशेषणे दिली जातात, जशी हिरवट, काळपट, गुलाबी, रंगीन... काय एक ना अनेक.

दोन रंगाची सरमिसळ किंवा त्याहून अधिक रंगाचे मिश्रण करुन नवीनच रंगाचा अविष्कार होतो. तसा भिन्न भिन्न स्वभावाचे माणसाचे रंगछटा संगतीचे रंग मिसळल्याने नाना त-हा स्वभाव गुणाच्या आढळतात, मुळात तुमच्या मनाच्या विचार करण्याच्या शैलीवर तुमचे रंगढंग ठरत असतात,, वयपरत्वे त्या छटा बदलत असतात, ते नैर्सगीक आहे, परंतु तुमच्यातील मुळ रंग बदलणे तसे अवघडच, परिस्थितीनुरूप व काळानुरुप त्यात अनेक रंग येवुन मिसळतात त्यानुसार जगण्याची रंगसंगती बदलत असते.

व्यक्तीमत्व व विचारसरणीही बदलत जाते. तुम्ही अनेंक रंगात रंगून तुमचा रंग वेगळा हे तत्व जपत असाल तर तुमची मुळ छटा कधीहि फिकट होत नाही. तुमच्या मनाला उभारी देणारे आविष्कार समोर आले तर ते आणखीनच गडद,ठळक होत जातात . सुयोॅदयाचा पहाटेचा व साजंसमयीच्या सुर्यास्ताचा रंग सोनेरीच असतो. समृद्धीचा रंग.. हिरवा., शांततेचा.. पांढरा., प्रेमाचा.. गुलाबी. राग-क्रोधाचा.. लालबुंद., दु:खाचा.. काळा, बालपणाचा.. सप्तरंगी, भक्तीचा.. केशरी. असे नाना रंग जीवनात असतात. जीवनात अनेक रंगसंगती येतात न जातात. त्याप्रमाणे आयुष्याला रंगछटा कोणतिही का असेना पण ती सदाबहार असली पाहिजे. ती काही प्रमाणात अन्य रंगसंगती करत खुलवली पाहिजे. त्यासाठी कुणीही काही म्हणो तुमच्या मनाला तुम्हीच टवटवीत ठेवणे गरजेचे असते. मगच म्हणता येईल ना, रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा....


Rate this content
Log in