प्रेम
प्रेम
आज १४ फेब्रुवारी, जागतिक प्रेम दिवस...
मनातील प्रेम व्यक्त करण्याचा किंवा आपल्या प्रिय व्यक्तीला जाणीव करून देण्याचा हा दिवस .पण मी म्हणते प्रेम हे एक दिवसीय असते का नाही ते तर कायम आपल्या हृदयात असते. असेल जर फोन हृदयामध्ये प्रेमाची घट्ट वीण तर मग खरे प्रेम व्यक्त करायला हवा कशाला असा प्रेमदिन .प्रेम या शब्दात प्रचंड सामर्थ्य आहे आणि त्याचा हेतू ही उदात्त असतो. प्रेमाची व्याख्याच करू शकत नाही एवढी त्याची व्याप्ती असते. आता हे प्रेम फक्त तरुण तरुणीतच असते किंवा प्रेमळ जोडीदारांमध्येच असते असे नाही .प्रेम हे आई-मुलात असते,वडीलांवर असते,भावाबहिणीत असते, मैत्रिणीवर असते,कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवर असते . आजी आजोबांवर असते.अहो प्रेम ही देण्य
ाची गोष्ट आहे. त्याग्याच्या सर्वोच्च पातळीला त्या परमोच्च बिंदूलाच प्रेम म्हणतात .
प्रेम एक संजीवन आहे जे कायम
हृदयात तेवणारे निरांजन आहे
प्रेम एक गोड भास आहे
प्रेम एक सुखाची चाहूल आहे जी
नकळत मनाला भूल पाडते.
प्रेम एक निरंतर नातं जे समोरच्या व्यक्तीच्या गुणांबरोबर त्याचे अवगुणही स्वीकारते .
प्रेम एक आश्वासक आधार,
प्रेम मनांचा संगम असतो.
प्रेम म्हणजे ज्यामध्ये दुसऱ्याचे सुख शोधण्यावही भावना सहजपणे मनात उत्पन्न होणे.प्रेम म्हणजे दुधावरची साय असते, आपुकीची ऊब असते ती अशी सहजच उतू जात नाही ,ही भावना प्रेमाचा खरा भाव दर्शवून जाते. प्रेम हे विश्वासावर जगते याची जाण प्रत्येकाने ठेवली पाहिजे.