शब्दसखी सुनिता

Others

3.5  

शब्दसखी सुनिता

Others

तुझी आठवण

तुझी आठवण

4 mins
190


आठवण हा फक्त चार अक्षरी शब्द . पण आयुष्यात खूप महत्वाची ही आठवण. आठवण येण्यासाठी काही काळ - वेळ लागत नाही. आठवण ही चांगली किंवा वाईट असो, पण ती आपल्या कायम लक्षात राहते. लोक म्हणतात की माणूस आठवणींशिवाय राहू शकत नाही. काही गोड आठवणी कायम आपण मनाच्या एका

कोपर्‍यात बंद करून ठेवतो. आठवणी चेहर्‍यावर कधी हसू आणतात तर कधी डोळ्यात अश्रू . एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या जाण्याने आपल्याला खूप त्रास होतो. पण त्याच्या आठवणींच्या आधारे आपण आयुष्य जगतो. माझ पण तसच आहे. येणारा दिवस कधीच तुझ्या आठवणींशिवाय जात नाही. दिवस जरी गेला तरी तुझी आठवण जात नाही. खरच ग , मी खूप miss करते तुला. आजपण तूझी खूप आठवण येते. तुला कधीच विसरू शकत नाही. कारण माझ्या आयुष्यात तुझ्यामुळेच खूप आनंद आला. खूप गोड आठवणी निर्माण केल्यास माझ्या आयुष्यात. तुझ्यामुळेच मी खूप गोष्टी शिकले.

यार ! आपने तो जीना सिखा दिया । तु मला शिकवले कि शहरात कस राहायच,

कस बोलायच , तु जो माझ्यात आत्मविश्वास निर्माण केलास ना मी आज शहरात न  घाबरता , बिनधास्त राहते, काम करते, ते फक्त तुझ्यामुळे. खूप आत्मविश्वास होता तुझ्यात , तोच तु समोरच्या व्यक्तीत निर्माण करायची. कोणी दुःखात असेल, शांत असेल तर त्याला कस हसवायच आणि बोलत करायच हे कौशल्य तुझ्यात होत, म्हणून तु सगळ्यांना आवडायची. मला खूप अभिमान होता तु माझी मैत्रीण होतीस. खरच मला प्रश्न पडायचा इतकी

चांगली व्यक्ती असू शकते का? हो. तु नेहमी दुसर्‍यांची काळजी घ्यायची , दुसर्‍यांना समजून घ्यायची, पण कधी स्वतःच प्रोब्लेम कळू द्दायची नाही.

खरच ग , किती हुशार आणि समजूतदार होतीस तू. फार कमी लोक दुसर्‍यांना समजुन घेतात.

       तुला आठवतय ... आपण किती पुस्तक वाचायचो! मग कोणी कोणत पुस्तक वाचल ते थोडक्यात सांगायच, गोष्ठीसारख.

किती स्पर्धा असायची आपल्यात पुस्तक

किती वाचून होतात ते बघण्यासाठी. आपला कामात वेळ कधी अन् कुठे जायचा कळतच नव्हत. सकाळी आल्याचा चहा घेतल्याशिवाय आपला दिवस सुरू व्हायचा नाही आणि कॉफी घेतल्याशिवाय दिवस संपत नसे. आपल्या मैत्रिनींमध्ये कोणी म्हटल , मला भूक नाहीये, मी आज जेवत नाही तर तू म्हणायची मी पण नाही जेवत.

तु उपाशी राहू नये म्हणून भूक नसणारी मैत्रीण पण जेवण करायची, हे फक्त तुलाच जमायच. कोणी उपाशी राहू नये म्हणून तु ही युक्ती करायची. मी कधी बाहेर गेले किंवा कामात असले तर किती कॉल करायची , मग काय

मला यावच लागायच वेळेवर जेवायला. मला अभ्यास करायला सांगायची अन् स्वतः माझ काम करायची. एकदा

माझ्या हाताला कापल होत तर तु मला कुठल्याच कामाला हात लावायचा नाही ,अशी सक्त ताकिद दिली होती,

अन् सगळ काम तु करायची. खरच तु प्रत्येकाची किती काळजी करायची . परिक्षा जवळ आली कि तुृ मला खुप

पाॅझीटीव्ह सांगायची. अभ्यास करायला प्रोत्साहन द्यायची.

अभ्यास कर नक्की पास होशील अस सांगायची त्यामुळे मी काम करून प्रत्येक परिक्षा पास व्हायचे. खूप मस् दिवस होते ते, आपण सर्व मैत्रिणी किती धमाल करायचो !

       आपण सगळ्या मिळून बाहेर फिरायला जाणे, हॉटेलात जाणे , गार्डन ला जाणे याला काय स्पेशल दिवसाची गरज नसे, मनात आल कि निघालो. एखादा सण असो किंवा कार्यक्रम असो, आमची तयारी कशी करायची हे लगेच सगळे मिळून ठरवायचो. गणपती आणि नवरात्र उत्सवाच तर प्लॅनिंग आधीच करून ठेवायचो.

     सगळ आयुष्य कस छान चालल होत , पण तु अचानक एक्झीट घेतलीस... यार . मला तेच तुझ आवडल नाही.

का अस , आम्हाला सोडून अचानक निघून गेलीस ? तेच समजल नाही . माझी तर तु खूप जवळची मैत्रिण होतीस पण तुझ्या अचानक जाण मनाला खूप लागल.

सगळ्यांना इतक छान हसवणारी , सगळ्यांची काळजी घेणारी , सगळ्यांना जीव लावणारी मैत्रीण अशी अचानक अर्ध्यावर साथ सोडून जाशील अस वाटल नव्हत. आपली एवढी मैत्री होती की मी चार दिवस सुट्टीला गावी गेले कि तुला करमत नव्हत म्हणून तु सारखी मला कॉल , मेसेज करायची आणि आता तर काहिच नाही. कधीच खोट बोलत नव्हतीस तु मला , एक तासपण न बोलता राहू न शकणारी तू ,आज सगळ्यांन

पासून खूप दूर निघून गेलीस तेही न सांगता. चिटिंग केलीस तु... तुला माहीत आहे

मी खूप miss करते तुला. सगळे तुझी खूप आठवण काढतात. कधी कधी तुझी

खूप आठवण येते. तुझी कमी मला जाणवते. पण काय करू ? तुझ्या गोड आठवणींनी मनाला सावरते ... तुला नव्हत आवडत मी दुःखी असलेल. म्हणून जगते आनंदात.

तुझी आठवण म्हणून पुस्तक वाचते, एकदा तु माझी वहीत मी लिहलेल वाचुन त्यावरून तु मला म्हणायची यार तु लिहीत का नाहीस... तु छान लिहू शकते. मी ॲप्सवर लेखन करते. वाचन करते पण ये, काय वाचल तु , मला

स्टोरी सांग ना म्हणणार कुणी नाही. तु सोबत नाही आहेस. पण तुझ्या आठवणी नेहमी माझ्या सोबत आहेत.

       तुझ्यासारखी मैत्रीण शोधून पण सापडणार नाही .खरच, तुझी जागा कुणी घेऊ शकत नाही.

       miss u friend !

        शेवटी म्हणतात ना गेले ते दिवस ... राहिल्या त्या आठवणी !



Rate this content
Log in