prabhawati sandeep Nandedkar

Children Stories Others

4.0  

prabhawati sandeep Nandedkar

Children Stories Others

तुझा प्रवास!

तुझा प्रवास!

4 mins
275


श्री आनंदराव हारजी माने यांची नात तीन वर्ष पूर्ण पण झाले नव्हते .खूप सुंदर नटखट आजोबाच्या हातात हात धरून ती गावातील शिवजयंतीच्या कार्यक्रमाला ती गेली. सर्वात लाडकी आजोबाची नात असल्यामुळे आजोबा तिला प्रत्येक ठिकाणी सोबत घेऊन जात असे. तिचे आजोबा समाजसेवक होते. ती शिवजयंतीला गेली असता तिच्या आजोबांनी तिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर छोट्याश्या अर्चूला, तिच्या आजोबांनी तिला जवळ बोलावले आणि हातात माईक दिला आणि शिवाजी महाराजा विषयी बोलायला सांगितले.


      छोटीशी अर्चू बोबड्या बोलात ती सर्वांचे मन मोहित करत होती. छोटीसी अर्चू तीनशे दोनशे माणसासमोर ती बिनधास्त बोलत होती. सर्वजण अर्चूच बोलणं शांतपणे ऐकून घेत होते. तिचं बोलणं ऐकून सर्वजण मंत्रमुग्ध होत होते. आर्चुचं शिक्षण इंदिरा गांधी हायस्कूल सिडको नांदेड येथे चालू झालं. ती मस्तीखोर खोडकर स्वभाव असूनसुद्धा ती लहान-मोठे सर्वांशी प्रेमाने वागत असे  ती शाळेतील प्रत्येक कार्यक्रमात कवी संमेलन नाटक डान्स भाषण वकृत्व स्पर्धा अनेक स्पर्धेत भाग घेऊन प्रथम क्रमांकाने विजय व्हायची.

    नटखट तुझा स्वभाव,,

     मासूमियत,,

     तुझी,,,

    प्रेमात पाढेे सर्वांना,,,

     छोटीसी तुझी हासी,,,,

     मंत्र मुक्त करते,,,


  बघता बघता अर्चना मोठी झाली. खोडकरपणाची जागा समज समजुतदारपणाने घेतली. तिला गोरगरिबांना गरजूंना मदत करायला खूप आवडत असे. समाजसेवा करायची ही तिच्या रक्तात होते. गरजूंना मदत करणे ही शिकवण तिच्या आई वडील बाबा आजी आजोबा पूर्ण परिवारापासून शिकवण मिळाली . ती अभ्यासात खूप हुशार मुलगी होती. हिंदू समाजात मुलीच्या लग्नाची खूप घाई करतात. मुलगी उपवर झाली की तिच्या लग्नाची लग्नाची तयारी करायला लागतात . अर्चनाच्या लग्नाची स्वप्न तिचे आई-वडील आजी-आजोबा पाहायला लागतात. अर्चनाच्या लग्नासाठी मुलगा पाहता-पाहता अर्चनाचा एज्युकेशन बीए .सी. कम्प्युटर सायन्स पूर्ण होते. अर्चना आज्ञाकारी मुलगी होती. अर्चनासाठी एक मुलगा घरच्यांनी निवडला दिसायला सुंदर प्रेमळ समजूतदार ,, छोटे सोबत प्रेमाने वागणे मोठ्यांचा आदर करणे , असा त्याचा स्वभाव त्या मुलाचे नाव देविदास यशाजी काळे , होते सर्वजण लाडाने देव म्हणत असे.  


     अर्चनाची सोयरीक झाली. पण अर्जुनाच्या मनात वेगळीच तळमळ होती. तिला काहीतरी वेगळं करून दाखवायचे होते. तिच्या मनात होतेेेेेे ते घरच्यांना सांगण्याची कोशिश अर्चना पणाने केली होती . पण तिचं बोलणं कोणीच ऐकून घेत नव्हते. अर्चना च्या मनात लवकर लग्न करायचे नव्हते. तरीही अर्चना हसतमुखाने लग्नाला तयार झाली . 13 मे 2000 ला देव आणि अर्चनाच लग्न झालं.

    हातात हात ,,,,

    तुझा घेऊनी,,,

     माणसे मायेची,,,

     सोडूनी,,,,

     ओलांडताना ,,,

     तुझा ,,,उंबरठा,,,

     साथ तुझा,,,

     मला,,, लाभला,,,

     मनोमन हीच प्रार्थना,,,,

     माझ्यामुळे दुःख नको तुला,,,

     सात वचन निभावीण,,, मी,,,,


    तिच्या मनात लपलेलं तिचं स्वप्न राहून राहून खूप त्रास देत होतं. राहून राहून तिला आठवण येत होती. तिच्या आजोबांनी अर्चनाच्या हातात माईक दिलेला. अर्चनाची आणि माईकची दोस्ती होत गेली. अर्चना तिने केलेले प्रोग्राम आठवू लागले . वकृत्व स्पर्धा लग्नातील मंगलाष्टिका तिने जे कार्यक्रम केले तेे तिच्या डोळ्यासमोर येत होते. माईकचा आवाज तिच्या कानी आला ती बेचैन होऊन जायची अर्चना मनातल्या मनात कमजोर होत होती. ती हमेशा विचारात गुंग असायची, ती मस्तीखोर, हसी मजाक के सर्व विसरत जात होती. हे सर्व तिचा नवरा बारीक लक्ष ठेवून बघत होता. 


     एका दिवशी देेवने ठरवले. आज अर्चनासोबत बोलायचं देवनी अर्चनाला बाहेर घेऊन गेले आणि विचारायला सुुुरुवात केली. तू हमेशा हसत-खेळत मस्ती करत राहायची आता तुला काय मनात काही आहे का ? काही असेल तर तू मला सांगू शकतेस आज मी तुझा नवरा नाही तर तुुझा दोस्त आहे. अर्चनानेे सर्व तिच्या स्वप्नांची कहानी नवर्‍याला सांगितली देवनी हसत अर्चनाला उत्त्तर दिले. बस एवढंच होतं का अरे पागल अर्चू मला सांगितलं असतंं तर जमलं असत ना तुला तुझं स्वप्न पूर्ण करायचंं आहे ना मी तुला वचन देतो तुझं स्वप्न मी पूर्ण करेन देेेवने अर्चनाचं स्वप्न पूर्ण करायचे ठरवले.

 

    देव आणि अर्चना एकमेकांवर खुप प्रेम करत असे काही वर्षांनी अर्चनाला एक प्यारीसी मुलगी झाली तिच्या मुलीच्याा संगोपनासाठी काही दिवस हाऊस वाइफ म्हणून राहू लागली. अर्चना ची सासू अर्चना वर खूप प्रेम करत असे, घर कामात सासूबाई अर्चनाला खूप मदत करत असे काही दिवसांनी अर्चनाने पुन्हा तिचं स्वप्न पूर्ण करायची हालचाल चालू केली. अर्चनाच्या स्वप्नपूर्तीसाठी तिच्या सासरच्यांनी तिला खूप मदत केली. अर्चना चे शिक्षण पूर्ण तिच्या नवऱ्याने केले. तिचे शिक्षण पूर्णण झाल्यावर अर्चनाच्या नवऱ्याने तूू तुला जर नोकरी करायचे असेल तर तू नोकरी करू शकतेस. देवणी असेे बोलले अर्चना च्या डोळ्यात पाणी आले घराजवळील रेडिओ स्टेशन मध्ये काम करायचेेे अर्चनाने ठरवले रेडिओ स्टेशनमध्ये अर्चनानेे निवेदिता हा शोध तीन दिवस करायचेेे असे ठरवले . विश्वास रेडिओ स्टेशनमध्ये इंटरंशिप तीन महिने केले काही दिवसांनी अर्चनाला लेडीज कट्टा हा शो होस्ट दिला. 2014 पासून 90.8 FM पोस्ट म्हणून चालू आहे. सात वर्षांत पाचशेपेक्षा जास्त भाग प्रसारित केले. अनेक कार्यक्रमांतून ती समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधू लागली.


अर्चनाला हिरकणी अवॉर्ड मिळाला हळूहळू तिचा आवाज आणि कार्यक्रम नाशिककरांच्याा मनावर राज करू लागला. विश्वास नांगरे पाटील रवींद्र सिंगल यांच्याशी झालेला संवाद अस्मरणीय होता. कर्करोग योजना नमिता परितोष कोहक मिसेस ग्लोबल युनायटेड लाईफ टाईम क्वीन 2018 यांच्या मुलाखतीने हजारोंना स्फूर्ती दिली मिसेस युनिव्हर्स लवली 2017 शिल्पा अग्रवाल यांनी त्यांच्याा मुलाखतीतून अनेकांना आत्महत्या करण्यापासून दूर केले या प्रवासात समाजातील अनेक घटक जसे आरोग्य अधिकारी , अभियांत्रिक ,वकील ,समाज सेवक, सामाजिक कार्यकर्त्या शिक्षण, क्षेत्रातील मान्यवर ,विद्यार्थी , यांना श्रोत्यांपर्यंत पोहोचण्यात यश आले. निवेदिता हा आता सुद्धा चालू आहे तो त्याच्या मनावर राज्य करत आहे , अर्चना देव काळे यांना पुढील कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा 

प्रभावती संदिप वडवळे नांदेडकर 


Rate this content
Log in