Rutuja kulkarni

Others

4  

Rutuja kulkarni

Others

ठहंराव

ठहंराव

3 mins
183


शी!! किती हा जीवघेणा पाऊस। दिवसभर आँफिसमध्ये बाँस आणि संध्याकाळी घरी जाताना हा पाऊस, उफ्फ! जीव अगदी नकोसा होतो. त्यात या पावसामुळे. बस चं उशीरा येणे हे ही सवयीचे झालयं.. आता आज ही 10 मिनिटे झाली तरी ही बस काय यायचे नावचं घेत नाही बुवा, अशी रोजची चं बस स्टॉपवर उभी राहून माझी माझ्या मनाशी बडबड चालली होती. तेवढ्यात तिथे एक 15 _16 वर्षाची मुलगी हातांत फुलांची टोपली घेऊन आली, "ये ताई फुले घे ना, ताजी टवटवीत आहेत.. घे ना..।", तिच्या या वाक्याने मी भानावर आले आणि "नको", एवढेच म्हणाले. त्यावर ती मुलगी पुन्हा म्हणाली, "अगं ताई ही मोगऱ्याची फुले तरी घे ना, फक्त 10 रूपायला आहेत. आज जास्त कोणी फुले घेतली नाहीत, तु तरी घे ना..", तिचे ते केविलवाणे बोलणे ऐकून मी ती फुले घेतली. खरेतरं नको असताना ही आपण फुले घेतली, यापेक्षा ती फुले घेतल्यावर त्या मुलीच्या चेहर्‍यावर जो आनंद उमलून आला होता, तो मला सुखावून गेला.

        फुले देऊन ती निघून गेली, परंतु आता या फुलांचे काय करू, हा प्रश्न डोळ्यासमोर उभ राहिला. आई असती, तर घरी गेल्यावर तिला दिली असती ही फुले, आणि मग तिने छानपैकी त्याचा गजरा बनवून केसांवर माळला असता, पण आई तर गावाकडे आहे, आपण तर एकटेचं रहातो ईथे, शिवाय आज कुठे बाहेर जायचे नाही आणि उद्यापर्यंत तर ही फुले खराब होतील,क्षणभरांत असे विचार माझ्या मनांत तरळून गेले.

जाऊदे सध्या तरी ही फुले पर्स मध्ये ठेऊन देऊया आणि सोसायटी मध्ये गेल्यावर बघू, कोणाला तरी देऊया, अशी स्वतःच्या मनाशी समजूत घालून मी ती फुले पर्स मध्ये ठेवणार ईतक्या चं बस आली, आणि मी तशीचं घाईगडबडीत बस मध्ये चढले. आज फारशी गर्दी नसल्याने मी बसमधे एका ठिकाणी खिडकी च्या शेजारची रिकामी जागा पाहून बसले. खिडकी शेजारची जागा म्हणजे बसमधून जाता येताना विरंगुळा, म्हणून मला पहिल्यापासूनचं खिडकी शेजारची जागा खूप आवडते. तिकीट काढून, मी पर्स मध्ये उरलेले पैसे ठेवताना, पर्स च्या खाली मला ती फुले दिसली. आणि मघाशी बस पकडण्याच्या नादामध्ये आपण फुले पर्स मध्ये ठेवायची विसरलो, हे लक्षात आले माझ्या. गडबडीत फुले पर्स खाली दबली गेल्यामुळे त खराब तर झाली नसतील ना, हे पहाण्यासाठी मी ती फुले हातामध्ये घेतली,अजूनही ती फुले तशीचं टवटवीत होती, एकदोन फुलांच्या काही पाकळ्या मात्र नव्हत्या, पण का कोण जाणे त्या फुलांचा तो टवटवीतपणा मनाला एकदम रिफ्रेश करून गेला.

       मी सहजचं त्या फुलांचा वास घेतला आणि क्षणार्धात हे जग थांबल्याचा भास झाला. जणू काही, सगळा थकवा, मावळून अंगामधे एक नवं चैतन्य बहरलं होतं. रोजच्या त्याचं त्या जीवनामध्ये एक नवी बहर आली होती. त्या मोगऱ्याचा मोहक सुगंध मनामध्ये एक नवा गंध दरवळून गेला. त्या प्रत्येक फुलांमध्ये बालपणी ची ती मोगऱ्याच्या झाडासोबतची, फुलासोबतची आणि प्रत्येक लग्नात किंवा सणांमध्ये घातलेल्या त्या मोगऱ्याच्या गजऱ्याची आठवण दडलेली होती. बाहेर कोसळणारा तो पाऊसावरचा राग ही माझा एव्हाना दूर झाला होता. आजकाल मोगरा सगळ्यांना माहित तर असतो, परंतु गुलाबाच्या त्या रंगीबेरंगी फुलापुढे जणू मोगऱ्याचा तो मोहक सुगंध कुठेतरी हरवला आहे, हे आज जाणवले.

मोगऱ्याच्या तो क्षणिक सहवास आज मला कित्येक क्षणांची, आठवणींची साद घालून गेला. जणू काही वेळासाठी माझे हे धावपळीचे, विचारांचे जग थांबले होते, आणि मी कुठल्या तर नव्या अशा जगामध्ये प्रवेश केला होता, असा भास मला झाला. कदाचित यालाचं तर तो "ठहंराव", म्हणतं असावे, आणि कदाचित याचं त्या "ठहंरावाची", मल गरजं होती...

 


Rate this content
Log in