तिसरा दिवस 27 / 03 / 2020
तिसरा दिवस 27 / 03 / 2020
आजच्या दिवसाची सुरवात पक्ष्यांच्या किलबिलाटाने झाली. आमच्या घरासमोर एक मस्त आंब्यांचे झाड आहे. त्या झाडावरच्या पक्ष्यांच्या आवाजाने प्रसन्न सकाळ झाली. आज घरातल्या जुन्या वस्तू स्वच्छ करून त्या व्यवस्थित ठेवण्याचे ठरवले आणि चढलो की माळ्यावर. माळ्यावर अनेक गोष्टी ठेवल्या होत्या. त्यात मला एक जुनी वही सापडली. वही तशी खूप जुनी होती साधारण दहा वर्षांपूर्वीची होती. त्यात मी शाळेत असताना काय खट्याळपणा केला होता त्याची एका पानावर नोंद होती. झालं असं की मी आमच्या इंग्रजी शिकवणाऱ्या शिक्षकांना यमदूत म्हटलं होतं. हे त्यांना समजलं होतं आणि त्यांनी मला माझ्या पालकांना बोलवायला सांगितलं होतं. दुसऱ्या दिवशी पालकांना शाळेत घेवून गेल्यावर त्यांनी सारी हकीकत सांगितली. त्यानंतर माझी जी खरडपट्टी निघाली होती की त्याला सांगता सोय नाही. आजही ती घटना आठवल्यावर ओठी हसू आल्याशिवाय राहत नाही. खरोखर खूप मजेशीर दिवस होते ते. खरोखर मला आज त्या जुन्या आठवणीत जायची संधी मिळाली होती.