ती नजर
ती नजर
एकदा ती बाहेरगावी निघाली होती. ट्रेनच रिझर्वेशन केलेलं ,तिला विंडो सीट मिळाली बाकीच्या पण सिट भरल्या पण तिच्या समोरची विंडो असलेली सिट मात्र मोकळी होती.
कोण येणार बर या सीटवर, ती आपली मनातल्या मनात विचार करत होती. विचार करण्याच्या नादात तिने पर्स मधून मोबाईल काढला व त्याच्यावर वरच्या स्टोरीज वाचत बसली बऱ्याच वेळाने मान वर केली तर समोरची सीट भरलेली होती . कोणीतरी एक माणूस होता ,तोपण तोंडासमोर इंग्रजी न्युज पेपर धरून बसला होता .तिने काही त्याचा चेहरा बघितला नाही. दोघेही आपल्या आपल्याच नादात, असेही सर्व प्रवासी एकत्र असून एकेकटे होते बहुतांशी सारे मोबाईल बघत होते काहीजण न्यूज पेपर वाचत होते.
सहज तिने वर बघितलं, दोघांची नजरानजर झाली आणि दोघेही एकमेकांकडे बघतच बसले .
आशुतोष गेल्यापासून तिने कोणत्याही पुरुषाच्या नजरेला नजर दिली नव्हती .आपलं काम भलं आणि आपण भल छोट्या नंदिताला सर्वस्व मानून त्याची आठवण म्हणून ती जीवापाड जपत होती बऱ्याच जणांनी तिला दुसऱ्या लग्नाचा प्रस्ताव दिला होता परंतु मुलीचे काय होईल या शंकेने तिने सर्वांना नाकारले सर्वांचे एकच म्हणणं मुलीला होस्टेल ला ठेवा किंवा माहेरी ठेवा. मुली सकट तिचा स्वीकार करायला कोणी तयार नव्हतं ती काही नंदिता ला सोडून राहायला तयार नव्हती .
त्याच्या मोटर सायकल ला एक्सीडेंट झाला आणि एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं हळूहळू त्याही दुःखावर खपली धरली ऑफिसच्या कामासाठी मुंबईहून पुण्याला चालली होती .त्याची नजर, त्याचं पहाणं, तिला एकदम ओळखीचं आणि आपलं वाटत होतं जणूकाही ती नजर यापूर्वी देखील पाहिलेली आहे खूप जवळची आहे परिचयाची आहे असं राहून राहून वाटत होतं. तो समोरचा पुरुष देखील तिच्यावरती प्रेमळ नजरेने वर्षाव करीत ह
ोता शेवटी एका बाईकडे जास्त वेळ बघणे बरे नव्हे म्हणून तो खिडकीबाहेर बघू लागला दोघांचाही असा लपाछपीचा खेळ सुरू झाला .दोघे ही मध्येच खिडकीबाहेर बघत तर कधी एकमेकाकडे बघताना चोरी पकडली नाही जाई
"अरे आपल्याला असं काय होते गेल्या पाच वर्षात आपण आशुतोषच्या आठवणींशी प्रामाणिक राहिलो कोणत्याही पुरुषाकडे डोळा वर करून बघितले नाही आज मात्र असं काय होतंय मी सतत समोरच्या पुरुषाकडे का बघते "तिला स्वतःचाच राग आला पण मन काही हातात येत नव्हतं ते बेट चोरून ,चोरून बघत होत. शेवटी पूणे आल दोघे ही आपापल्या जागा सोडून खाली उतरले शेवटी उतरताना त्याने स्वतःची ओळख करून दिली हॅलो मी अशितोष अय्यर, हे माझे विजिटिंग काय कार्ड तुम्हाला काही वाटलं तर फोन करा असे म्हणून त्याने आपले कार्ड तिच्या हातात जबरदस्ती कोंबले व तिला बाय करत डोळे मिचकावत हसत हसत तो आपल्या रस्त्याने चालू लागला आणि तिला एकदम स्ट्राइक झाले अरे ही तर आपल्या आशु ची सवय बोलता बोलता डोळे मिचकावायची आणि याचे नाव पण आशुतोष आणि तिला एकदम आठवलं आशुतोष चे डोळे दान केलेले होते. त्याने पूर्वी म्हणजे लग्नाच्या पण आधी आय डोनेशन चा फॉर्म भरून ठेवलेला होता तेव्हा तो एवढ्या लवकर कामाला येईल येईल असे त्याला वाटले नसेल पण त्याच्या इच्छेप्रमाणे तिने डोळे दान केले होते तेच ते डोळे तिला पुन्हा भेटले म्हणूनच तो आपलेपणाचा भाव आणि प्रेमाचा वर्षाव करणारे ते डोळे तीला खूप जवळचे का वाटले याचे उत्तर दिला आता मिळालं आणि नाव सुद्धा अशितोष केवढा हा योगायोग बरोबर काही नाती जन्म जन्मांतरीची असतात याचा प्रत्यय आज आला. तीने ते कार्ड अगदी जपून हृदयाच्या कप्प्यात आणि मेंदूच्या चिप्स मध्ये देखील ठेवले कधीतरी आशु ची तीव्र आठवण आली तर ती त्याला फोन करणार होती