Hurry up! before its gone. Grab the BESTSELLERS now.
Hurry up! before its gone. Grab the BESTSELLERS now.

Vasudha Naik

Others


2  

Vasudha Naik

Others


स्वातंत्र्यदिन

स्वातंत्र्यदिन

1 min 104 1 min 104

   हा भारताचा राष्ट्रीय सण आहे, १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला,या आधी भारत इंग्रजांच्या गुलामगिरीत होता. प्रजा सुखी नव्हती.अनेक जुलूम होत होते. अमीर, गरीब, काळा, गोरा, धर्मभेद अशा समस्येतून जनतेला जावे लागत होते. म. गांधींच्या नेतृत्वाखालीझालेल्या लढ्यात भारतीयांचा विजय झाला. या लढ्यात खूप नुकसान झाले.हजारो लोक मारले गेले.लाठीमार,गोळीबाराला सामोरे जावे लागले. अनेकांना तुरुंगात जावे लागले. अनेक नेत्यांच्या मार्गदर्शनामुळे व त्यांच्या बलीदानामुळे आजहा स्वतंत्रतेचा दिन आपण पाहत आहोत.


  गांधी,नेहरू,भगतसिंग,बोस,अशी किती नावे घ्यावीत. डाॅ. बाबासाहेबांनी भारताची राज्यघटना बनवली आजही ती आपण पाळत आहोत. आपला तिरंगा आजही अभिमानाने या दिनी गगनी फडकतो. त्याला पाहून बलिदान केलेल्यांचे स्मरण झाल्याशिवाय राहत नाही. धन्य ते सुपुत्र ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपले बलिदान दिले. धन्य ती माऊली जिने अशा पुत्राला जन्म दिला.


    स्वातंत्र्याचा स्वैराचार नको. पण आजही बाईला हवे तसे स्वातंत्र्य नाही.हे मात्र जरा लिहावेसे वाटले.मन मोकळेकरावेसे वाटले. आज या स्वातंत्र्यदिनी कोरोनामुळे शाळा, काॅलेज, सरकारी कार्यालये इथे मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत झेंडावंदन होणार आहे. जसे गेल्या वर्षीही झाले.

   कोरोनाचा नादच आहे रे खुळा

    भलताच आजार पडलाय गळा

आता यालाही आपण घालवून देवू. चले जा कोरोना... म्हणत सर्वांनी लस घेवू, नियम पाळू.व कोरोनाला देशातून घालवून परत एकदा मोकळ्या हवेत मुक्त श्वास घेत स्वातंत्र्याची गीते गाऊ....

नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करू....


Rate this content
Log in