*सुसंस्कार*
*सुसंस्कार*
मी इयत्ता चौथीला होते.आता या गोष्टीला सतरा वर्षे झाली.
माझ्या वर्गात उमेश खाडे नावाचा मुलगा होता.
त्या वर्षी सतत वर्गातून काही मुलांच्या वस्तू गायब व्हायच्या.तसेच १ ली ,२ री , ३री च्या वर्गातूनही कंपास,पेन ,पेन्सीली,रबर,इ. वस्तू गायब होत असत ..मी याला चोरी म्हणत नाही,मी याला जे मुलाकडे नाही त्याचे Atteraction म्हणते.
रोज घडणार्या या गोष्टीकडे जरा गंभीरपणे पाहू लागले.वर्गातल्याच दोन मुलांना लक्ष ठेवायला लागले.मला जरा उमेशवर संशय होता.
मुलांनी प्रामाणिकपणे शोध लावला.व मी मधल्या सुट्टीनंतर वर्गात आल्यावर मुलांनी मला त्याचे नाव सांगितले.
मी न चिडता वर्गात एक गोष्ट सांगितली.'एका चोराला फाशीची शिक्षा होते.त्याची शेवटची इच्छा विचारतात.तो म्हणतो मला आईला काहीतरी सांगायचे आहे.कोर्ट परवानगी देते.तो चोर आई
च्या कानात सांगतो आई तू मला कायम चोरी करण्यास परावृत्त केले नाहीस. म्हणून आज माझ्यावर ही वेळ आली. मला तू कायम पाठीशी घातलेस.असे म्हणून तो आईच्या कानाला कडकडून चावतो.'
ही गोष्ट सर्वांनी ऐकली. पण उमेश रडायलाच लागला. अगदी ढसाढसा.
त्याने मुलांच्या वस्तू घेतल्या ते कबूल केले.तसेच आईने त्या वस्तू कपाटावर ठेवल्या हे ही सांगितले, मला खूप आश्चर्य वाटले. एक गोष्ट मुलांच मन परिवर्तन करते.
दुसर्या दिवशी त्याचे बाबा आले.त्यांनी दोन पिशव्या भरून साहित्य आणले. व माझी माफी मागितली.मुलाला सुधरवल्याबद्दल खूप आभार मानले.
आजच्या दिवशी हा मुलगा हिंजवडी सारख्या ठिकाणी इंजिनियर आहे.
विशेष म्हणजे आज दुपारीच तो fb वर मला join झाला. आणि मला बोलला'बाई आज मी तुमच्यामुळे या पदावर आहे' हे ऐकून मला माझ्या कामाची पावती मिळाली.