Click here to enter the darkness of a criminal mind. Use Coupon Code "GMSM100" & get Rs.100 OFF
Click here to enter the darkness of a criminal mind. Use Coupon Code "GMSM100" & get Rs.100 OFF

Smita Bhoskar Chidrawar

Others


3  

Smita Bhoskar Chidrawar

Others


सुंदर माझं घर...!

सुंदर माझं घर...!

3 mins 236 3 mins 236

मीरा आणि राघव अगदी स्वाभावाने वेगळे पण एकमेकांच्या प्रेमात कधी पडले ते कळलंच नाही.मीरा श्रीमंत घरातली आणि राघव साधारण परिस्थीती असणाऱ्या कुटुंबातला..राघव ची साधीशी नोकरी आणि जेमतेम परिस्थीती बघून मीराच्या वडिलांनी लग्नाला साफ नकार दिला... राघवच्या घरच्यांचा सपोर्ट होता म्हणून दोघांचं साधेपणाने लग्न झालं. मीराच्या घरचे कोणीच लग्नाला हजर नव्हते...सगळ्यांनी तिच्याशी संबंध तोडून टाकले...

नवी नवरी घरात आली सगळ्यांनी तिचं हसून स्वागत केलं , प्रेमाने तिला आपलंसं करू पाहिलं ...पण मीरा श्रीमंतीत वाढलेली , तिला या छोट्या घराचा , इथल्या लोकांचा खूप त्रास होऊ लागला ... मीराची चीड चीड वाढतच होती...राघवच्या घरच्यांनी राघवला स्वतंत्र घर घेऊन वेगळा संसार थाटण्याची गळ घातली...


सगळ्यांच मन मोडू नये म्हणून राघवने नवीन घर घेण्याचं ठरवलं...मीराला खूप आनंद झाला ...आता तिचं स्वतंत्र घर असणार होतं , तिथे तिला वाट्टेल ते करता येणार होतं...पण राघवच्या तूटपुंज्या पगारात खर्च भागवणयासाठी तिला तारेवरची कसरत करावी लागणार हे तिच्या लक्षातच आलं नव्हतं... 'आपलं पहिलं घर स्वतःच कसं असेल , किती मोठं , सुंदर , बाहेर मोठी बाग , झोपाळा बांधू तिथे आणि मस्त दोघेच प्रेमात हरवून जाऊ...फक्त सुखाची बरसात असेल...' मीरा घराचं स्वप्न बघू लागली...


राघवने त्याच्या बजेट मधलं एक घर फायनल केलं आणि मग तो मीराला घर दाखवण्यासाठी घेऊन गेला...छोट्या छोट्या दोन खोल्या , एकात बैठं किचन आणि दुसरी एक खोली... चाळीतल् ते घर , ना फारसा उजेड ना मोकळी हवा आणि बाग , झोपाळा हे तर फक्त स्वप्नातच शक्य होतं...

मीराला ते घर आजिबात आवडलं नव्हतं पण राघवच्या बजेट मध्ये यापेक्षा चागलं घर येणं शक्य नव्हतं आणि मीराला तर तिचं स्वतःच घर हवं होतं त्यामुळे नाईलाजाने तिने होकार दिला ! थोड्याच दिवसात राघव या जागेला कंटाळेल आणि मग नवीन मोठं घर घेईल याची तीला खात्री होती ...

मीराचा पुन्हा एकदा गृह प्रवेश झाला... दोघा राजा राणीचा नवलाईचा संसार सुरू झाला...दोनच दिवसात मीरा वैतागली...कसलं हे घर सुरू होताच संपतं...ना हवा ना उजेड ना कुठलं फर्निचर ?


राघवने त्याचा पूर्ण पगार रमाच्या हातात दिला , तो दोनच दिवसात संपला.पैशात लोळणाऱ्या मीराला काटकसर कशाशी खातात हे माहिती नव्हतं आणि माहिती करूनही घ्यायचं नव्हतं...आता काय करायचं ? राघव तिच्यावर खूप चिडला...इतकी साधी अक्कल तिला का असू नये असं त्याचं मत होतं... मीराही त्याला खूप बोलली...राघव तिला एकटीला सोडून आपल्या आई बाबांच्या घरी निघून आला...


मीरा एकटीच रडत राहिली...' किती स्वप्न बघितली होती मी आपल्या पहिल्या घराची ...पण दोनच दिवसात पार धुळीला मिळाली...काय करायचं आता? मम्मी पप्पा तर बोलतही नाहीत आपल्याशी . राघव चे आई बाबा किती छान आहेत , किती प्रेम करायचे आपल्यावर आणि आपण त्यांना सोडून आलो त्याचीच शिक्षा मिळाली आपल्याला...' मीरा ताबडतोब राघवच्या घरी गेली...


तिकडे राघवच्या घरच्यांनी त्याला मीराला एकटी सोडून आल्याबद्दल चागलं खडसावल होतं...मीराला दारात पाहून सगळ्यांनाच बरं वाटलं...

मीराने सगळ्यांची माफी मागितली...आईंनी तिला जवळ घेतलं मीराचा बांध फुटला...आईच्या कुशीत रडून तिचं मन मोकळं झालं...

मीराने राघवकडून वचन घेतलं ..

"आता हेच आपल्या दोघांचं पहिलं घर आणि शेवटचसुद्धा...इथून कधीच कुठे जायचं नाही " !!


Rate this content
Log in