Akash Mahalpure

Others

1  

Akash Mahalpure

Others

सुखी-संसाराचं रहस्य..

सुखी-संसाराचं रहस्य..

2 mins
1.0K


मान्य आहे ना..तुम्ही जसे तुमच्या आईबापाच्या काळजाचा तुकडा असता तसा आमचा भाऊही खुप लाडाकोडात वाढलेला असतो..त्यालाही आईने किती त्रास सहन करून जन्म दिला असतो.लग्नापर्यंत तो ही शिक्षण,करिअर,मित्रपरिवार या साऱ्यामध्ये गुंतलेला असतो.तेव्हा छानसा संसार करायचा अनुभव तुमच्यासमवेतचं त्याचाही सुरू होतो.आईबापाच्या संसारात तुमचं पात्र जेवढं सोप्प असतं..तितकचं त्याचंही असतं.त्याला सगळचं समजायला हवं..ही अपेक्षा आणि त्याला काहीचं समजत नाही हा तर्क दोन्ही अतिरेकी आहेत..तुमच्या आजारपणात तो तुमच्या नको त्या अपेक्षा पूर्ण करेल..अशी कदापीही अपेक्षा कधी करू नका..बऱ्याच मुलांना असा काही त्रास असतो हे माहित नसतं..कारण त्यांच्या आईला (कदाचित)तेवढा त्रास झालेला नसतो.तेव्हा तोंड वर करून अमुक कर किंवा तमुक कर..असा सांगण्याचा प्रयत्नही कधी करू नका..आणि केलं नाही म्हणून तोंड पाडूनही कधी बसू नका.

भावाची विशेषत: आर्थीक लायकी काढताना आपल्या बापाने आपल्याला कुठल्या कष्टात वाढवलयं आधी ते बघा..

    आपण आपल्या हिमतींवर पहिले काय करू शकतो ते आजमवा..आणि मग विषय काढा.तुम्ही जसं उंची,अनुरूपता,पगार,पोस्ट,इस्टेट,घरातलं स्थान बघून लग्न केलं..तसं त्यानेही रूप,रंग बघुन केलं..तसा तर तो साऱ्या जगाचाचं व्यवहार आहे..भावूक व्हायची काहीही गरज नाही. तुम्ही जसं ठरवून,सर्व बघुन लग्न केलं..आणि तुम्ही सांगितलेली प्रत्येक गोष्ट तो हो म्हणेल असं कधीचं होणार नाही..तुम्हाला जशी तुमची आई प्रिय आहे..तशी त्यालाही त्याची आई प्रिय आहे..तुमच्या आईला जसा तुमच्या संसारात असण्याचा अधिकार आहे..तसा त्याच्या आईलाही आहे.आमचा भाऊ म्हणजे काही देवीला सोडलेलं कोकरू नव्हे..विसरून जाईल..तर तोही तीच्या जीवाचा प्राण असतो.तो आनंदी आहे का..त्याला काही त्रास वैगैरे तर नाही ना..हा संपूर्ण विचारपूस करण्याचा,बघण्याचा अधिकार त्याच्याही आईला आहे.

   तुम्हाला सासु-सासरे नकोचं होते तर तुम्ही अनाथ मुलाशी लग्न का केलं नाही..

करायला हवे होते ना..!कशाला आमच्या गरीब-माय बापाला फसवलतं..!

बघा नां..तुम्ही तासंनतासं तुमच्या आईशी बोलणार आणि तो दहा-मिनीटं बोलला कि तुमचा लगेच गळफाट होणार..

हे कधीही चालणार नाही..

तुम्हाला सांगू..! तूम्ही यायच्या आधीपासून आई-वडील,भाऊ,बहिण त्याच्या आयुष्यात आहे.तेव्हा शांत रहा..प्रत्येक मुद्दावरून त्याला धारेवर धरू नका.

आई-वडिलांबरोबरच भाऊ,बहीण,मित्र,मैत्रिणी ही त्याच्या जगण्याचे अविभाज्य भाग आहेत..त्या बाबतीत अडवणूक नको..

नको म्हणजे नकोचं..!

   दळण,स्वयंपाक,आला गेला,स्वच्छता,आर्थिक बाबी,प्रवासाचं नियोजन ई‌.बाबींत परफेक्ट नाॅलेज असणारा माझा भाऊ तुम्हाला कुठेही सापडणारं नाही..आणि शोधूही नका.

आणि परत एकदा तुम्हाला कायं हवं आहे ते सर्वांसमोर सांगा..तुमच्या आईला त्याच्याकडून मान हवा असेल तर..तुम्हीही त्याच्या आईशी नीट वागा.


(आजच्या पिढीतील प्रत्येक मुलीला माझ्या मनातलं सांगण्याचा हा छोटासा प्रयत्न..चुकल्यास क्षमा असावी..थेट नावानीशी हे पत्र शेअर करायला हरकत नाही)


Rate this content
Log in