दुष्काळ एक मोठी समस्या..
दुष्काळ एक मोठी समस्या..
प्रिय महाराष्ट्र..,
दुष्काळाचा माहेरवाशी तु..विझुन गेलेली तुझ्या गावची शिवारं..पाण्याच्या थेंबाशिवाय घशात कोरड पडलेल्या तुझ्या गावाच्या विहीरी..भेगाळत चाललेली तुझ्या गावातील ओढ्या, नद्या, नाल्यांची पात्र..रुसन बसलेली तुझी मायेची धुन-धुणारी "आई"..हंडाभर पाण्यासाठी वण-वण हिंडाव लागत असणारी तुझ्या गावची माणसं..चारा पाण्यासाठी व्याकुळ झालेली मुकी जनावरं..पाण्या अभावी न आलेले मुलीचे आमंत्रण..भरमसाठ संपत्ती असुनही मुलांच भवितव्य..खेड्यापाड्यात, तालुक्यात कुणीही जगायला तयार नाही..याचं सार नक्षीमय चित्र तुझ्याचं गावात मांडतय ना..!
कशी होती ना..तुझी आनंदाची गावं..या पाण्याचा मुक्काम तुझ्याचं गावात असायचा..रोज सकाळच्या प्रहरीला गावातील 'माता-भगिनी' धुन धुवायला यायच्या..मन मोकळ्या गप्पांचा तपशील जमायचा..हास्येला बांध फुटायचा.ते झुळ-झुळणारं तुझ्या गावचं पाणी आनंदाला ओलावा द्यायचं..जगण्याला अल्लडपणे फुलवायचं.गावातील मजूर आपल्या कुटुंबा सोबत गावातच मायेचा विसावा घ्य
ायचं..त्या तुझ्या गावच्या ओढ्यांमध्ये,विहीरीमध्ये,नदी-पात्रामध्ये बाल-गोपालांचा पोहण्याचा आनंद विसायचा..एक बालपणाची आठवण असायची.गुरू-ढोरं सांजेला गोठ्यात असायची.गोठा गुरा-ढोरांनी तुडुंब भरलेला होता.तो एक वेगळाच चैतन्याचा उत्साह होता.मुला-मुलींना आमंत्रण होती..'बाप' मोठ्या मनाने कन्यादान करायचा.कापसाची पिक घेणारी गावकरी मंडळी रेशमाच्या रेशीम धाग्यांनी आपलं आयुष्य विनायची. ज्वारी,बाजरीची पिक नाचतांना दिसायची.. तीच ज्वारी,बाजरीची भाकरं भुकेचा घास भरवायची.पानं,फुल हसतांना,खिदळतांना दिसायची. खेड्यापाड्यात, तालुक्यात जगायला मजा यायची.एक नव्या विश्र्वात घेऊन जायची.समृद्धीचा आसरा द्यायची.
खरचं आयुष्याचं सारं सुख तुझ्या या गावातंच दाटलं होतं ना..मग हे चित्र बदललं कसं.याला अपवाद तुझ्याच गावची माणसं ना..!!
करशील तु यांना माफ..??
त्यासाठी पाण्याचा एक थेंब हा आयुष्यभराचा मुल-मंत्र जोपासुया.. नदी-जोड प्रकल्प,पाणी साक्षरता अभियान राबुया.दररोज पाणी जपुन वापरा..म्हणजे उद्या पाणी येईल..अशी महत्वकांक्षा ठेवुया.