गुरुचे महत्व
गुरुचे महत्व


गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः
गुरुः साक्षात् परब्रम्ह तस्मैश्री गुरवे नमः
जग हाच रंगमंच असतो ही जाणीव आणि शिकवण देणारे गुरु नंतर..
परंतु आई-वडील, शिक्षक, मार्गदर्शक शाळेत असताना किंवा बाहेरच्या जगात हसताना, बागडताना या टप्प्यात जीवनाच्या रंगमंचावर ज्यांनी ढकललं.. उभं केलं.. त्या सर्व गुरूवर्यांची आज तीव्रतेने आठवण येते.. इथपर्यंतच्या प्रवासाला या गुरूवर्यांची आठवण होणं ही कृतज्ञता फार महत्वाची आहे.
आपल्यामध्ये कितीही आत्मविश्वास असला.. पायांमध्ये चालण्याची ताकद असली.. समोर हजारो वाटा असल्या.. त्यापैकी कुठली वाट निवडायची हे जो व्यक्ती सांगतो.. तो व्यक्ती म्हणजेचं आपले गुरू.. काय करायचं यापेक्षा काय नाही करायचं.. याकडे ज्यांचं सर्वांत जास्त लक्ष असतं.. ते म्हणजे आपले गुरु.. आपल्याला हजार पुरस्कार मिळतील खरे.. पण त्यांची एक शाब्बासकी मिळावी.. हे सतत ज्यांना वाटतं.. ते म्हणजे आपले गुरु..!!
या रंगमंचावर वावरत असताना लाभलेल्या प्रत्येक गुरूवर्याला माझा शतशः प्रणाम!!!