धोनी एक नवीन उद्यक्रांती..!
धोनी एक नवीन उद्यक्रांती..!
थोडेच दिवस शिल्लक आहेत..,
खेळू द्या ना त्याला हव तसं..!
द्याना मान-सन्मान त्याला हवा तसा..!
धोनी..!धोनी..!!धोनी..!!!
वेळ संपत आली आहे., काय लिहावं..सुचतचं नाहीयं खरचं..!
तू मैदानावर दिसणारचं नाही का कधी "इंडियन" जर्सी मधे..
तू तोच व्यक्ती आहे ना ज्याने जिंकण्याचं व्यसन लावलं..,तू तू तोच व्यक्ती आहे ना ज्याने सर्व ट्रॉफी जिंकण्याचा विक्रम केलाय.. तू तोच व्यक्ती आहे ना ज्याने शेवटच्या 2 चेंडूवर 12 धावा हव्या असताना पण आपण जिंकू शकतोस हा आत्मविश्वास दिला..
तुला सांगू.. तू गेल्यानंतर तुझ्या सारखा दुसरा फिनीशर होणार नाही.. हे बोलण्यातचं आमचं अख्खं आयुष्य जाणार आहे.
पण एक गोष्ट लक्षात ठेव "माही".. तू जर का एकदा "टीम इंडिया" मधून गेलास तर कसं होईल हे माहीत नाही.. पण मी फक्त तुझा फॅनच नाही तर तुझा दीवाना सुद्धा आहे..जेवढं त् मुलीला मीस केल नसेल तेवढ तूला करेल..!
बघ ना..रेल्वे टीम सोबत खेळत असताना पहिली बॅट ही तुला तुझ्या मित्राने स्वतःच्या पैशातून विकत घेऊन दिली होती आणि एक जगजेत्त पर्व आता सुरु होणार होत..पण खरे आभार तर आपण त्या "बॅनर्जी सरांचे" मानायला हवेत. ज्यांनी तूला जाळीच्या पुढं चड्डी घालून उभ न करता 3 लाकडी दांड्यान मागं उभ केलं..
तूझा तो डिसेंबर 2004 मधील मीरपूर बांगलादेशातील आगमनाचा दिवस आजही आठवतो लांब सडक केस, 52 इंच छाती, हातात विजयाची तलवार, चालण अगदी कसलेल्या मातीतल्या पैलवाना सारखं.. सगळं कसं रुबाबदार होतं.. पण लागलीच कसा सिलसिला.. पहिल्याचं चेंडूवर वर शून्यात धावबाद.. धक्काच बसला.. विचार केला 'हर जिरो की एक कहानी होती है'.. त्याच वेळेस वाटलं होतं..
आता खरा अध्याय सुरू होणार..
आणि तसचं झालं..पाकिस्तान दौऱ्यावर 148 धावा.. आररर त्या 'राना नावेदला' लागोपाठ 3 षटकार ठोकून त्याच करियर डायरेक्ट बर्बाद केलंस..आणि मग तिथूनच "परवेज मुशर्रफ" तुझा दिवाना झाला.. तुला आठवतं श्रीलंका जयपूर 183 "चामुंडा वासला" दोन खणखणीत कव्हरला खेचून नाकातला वास घ्यायला लावलास..
इंग्लंड-धर्मशाला 138 तुझ्याकडून वाचावं म्हणून तो "एंडर्सन" पायावर यॉर्कर मारू लागला, पण "माही" तू त्याला विना टिकीट हेलिकॉप्टरमध्ये बसवून थेट बीरमींगहैँम ला सोडुन आलास.. काय पाहुणचार केला होता..
तुला सांगू दहा-पंधरा वर्षाच्या काळात विकेट किपिंगचा एकही वाईट दिवस आमच्या वाट्याला येऊ दिला नाही.. आज छत्तीस वर्षाच्या वयातही 22कार्ड धावपट्टी पा
र करताना युसेन बोल्टलाही तू मागे टाकतोस..
खूप काही दिलस तू..
खूप काही शिकवलस तू..
आपल्या ध्येयांवर प्रेम करायला सुद्धा शिकवलं तू..
तुझी ती गोष्ट किती भावनाहीन होती..जेव्हा तू आस्ट्रोलियात होता आणि तुला मुलगी झाली होती..तेव्हा तू तिला चक्क 40 दिवसांनी बघितलं होत..त्याचवेळेस तूला पत्रकारांनीही विचारलं होत,अस का केलसं ?..तेव्हा तू किती मार्मिक उत्तर दिल होतं.."आधी देश.., सगळ्या भावना ड्रेसिंग रूममध्ये सोडून द्यायच्या असतात..
खरचं किती कणखरं होतास ना तू..
विराट, जडेजा, रैना, अश्विन शमी, रहाणे हीच तर तुझी खरी इन्वेस्टमेंट.. आणीबाणीच्या क्षणी तू तर चक्क सिनियर्स ला डावलून यांच्यावर विश्वास दाखवला होता.. किती किती टीका सहन केल्यास ना तू.. पण आजच्या या इन्वेस्टमेंटचा रिफ्रेडेबल प्रॉफिटच क्रेडिट नाही घेतलसं.. संघ हरला की तु संपूर्ण जबाबदारी स्वतःवर घेतोस.. पण जिंकल्यावर मात्र फ्रेम मध्ये कॉर्नरला दिसतोस.. कसं जमतं रे तुला हे..
आज तिसऱ्या नंबर वर येऊन अधिराज्य गाजवणारा कोहली, ओपनिंग ची सुरुवात करायला तू संधी दिल्यास सोबत 2 द्विशतक झळकावणारा रोहित शर्मा, सहा षटकार ठोकणारा युवी पाजी,रैना-पांड्या सारखे फिनिशर, पूर्वी दहा दहा म्हटलं तरी तंतरणारी आपली बॉलिंग आज चार धावांची ही सहज मॅच जिंकवणारा "बुमराह".. आणि नुसत्या क्षेत्ररक्षणाचाच्या जोरावर मॅच फिरवणारा "सर जडेजा".. या पोरांच्या डोक्यावर सुद्धा तुझा परिस रुपी हात पडला आणि पोरांनी अख्ख्या जगाचं सोनच लुटलं..
टेस्ट ची रिटायरमेंट अनाउन्स करण्याआधी रात्री एक वाजता तू "रैना" ला हॉटेल रूम मध्ये बोलावून घेतलं आणि त्या व्हाईट जर्सीवर सेल्फी घ्यायला लावलास.. त्या रैनाला काही समजायच्या आधीच तू म्हटलास.. इथून पुढे मी कसोटी खेळणार नाही.. आणि तसाच त्या व्हाईट जर्सीवर झोपून गेलास..
हरल्यावर सुद्धा इतरां सारख्या ब्याटा, ग्लोजेस तू फेकल्या नाहीत
शांतच राहिलास.. आमच्या गल्लीतील क्रिकेट मध्ये एक जरी व्हाॅईट बॉल टाकला ना तरी अख्ख्या खांदानाचा उद्धार होतो.. "तू एवढा कसा कुल रे".. 'मी जेव्हा मरणाला टेकेल तेव्हा मला मोठ्या आवाजात "रवी शास्त्री" च्या कॉमेंट्री सोबत धोनी चा वर्ल्डकप विनिंग षटकार दाखवा..' हे चक्कर "सुनिल गावसकरांचे" बोल.. प्रिन्स ऑफ कोलकत्ता खूद्द दादा असे म्हणतो.." दुसरा ग्रिलख्रिस्ट नाही होऊ शकत..,
कारण तू पहिला "महेंद्रसिंग धोनी" झाला आहेस"..!
तुझाचं चाहता..!