एक आठवण..
एक आठवण..


आयुष्याच्या थकबाकीचा हिशोब लावायला जोडीदाराची साथ लागतेचं..!!
काल परवा कडे पाळधी वरून एक वयस्कर जोडपं जळगाव ला आलं होतं..
कदाचीत ते दवाखान्यात तब्येत दाखवायला आले असावेत..
हे मला त्यांच्या बोलण्यातून जाणवलं..
दवाखान्याच्या समोरच असलेल्या बगीचातील बाकावर बसून ते भुकेने व्याकुळ होऊन घरच्या शिदोरीचा आस्वाद घेत होते..आणि गप्पा मारत होते.त्यांच्या पोटात जाणारा एक एक घास
जणु मुखी पांडुरंगाची साद घालत होता.आणि उभ्या आयुष्यात एकमेकांची साथ काय असते हे दर्शवत होता.
खुप बरे वाटले त्यांच्या कडे बघुन..आणी मनाशीचं म्हटलं..खरचं प्रेम असावं तर असं.. जे शेवटच्या श्र्वासापर्यंत साथ देईल..अगदी परमेश्वराला ही प्रश्न पडायला हवा..आपण एक जीव घेऊन चाललोय की दोन..!
त्यांनी माझ्याकडे पाण्याची मागणी केली..लेका आम्हाला पाणी तरी आणून दे रे..
मी म्हणालो..
बरं देतो आणुन..
मला ना त्याचवेळेस त्यांचा असणाऱ्या प्रेमाच्या-हळव्या पोटी त्यांचा नकळत फोटो घेण्याचा मोहचं आवरला गेला नाही.
मी तो घेतला आणि त्यांना दाखवला देखील.
त्यांनी फोटो पाहीला आणि त्यांना खुप खुप आनंद झाला..अगदी नविन जोडप्या सारखे दोघेही एक-मेकांकडे पाहु लागले आणि हसु लागले..
तुम्ही आजकालची मुलं ना काहीही..करतात.
फोटो पाहून त्यांनी अगदी पटकन आनंदाने प्रतिक्रिया दिली.कदाचित त्यांना वारकरी संप्रदायची आवड असेल..असं मला वाटले..मी त्यांना त्या बद्दल विचारले ही..आणि ते म्हणाले ही..आज जे काही ते या विठू-माऊलीच्या आशीर्वादा मुळेच..
मी तिथून जाण्यासाठी निघालो..पण आज्जी बाईंनी परत मला आवाज दिला आणि म्हणाली..
अरे लेकरा काय करणार आमच्या या फुटूचं ? या प्रश्नांने मी थोडा दचकलो..
आणी थोडं मिश्कील हास्य देत तसाच उभा राहीलो ते देखील मिश्कील हास्य देत माझ्याकडे नजर रोखुन मोठ्या उत्तराच्या अपेक्षेने पाहू लागले.
आणि म्हणाले बोल..रे.. लेका घाबरू नको..
मी विचार केला..यारं..र..र..काय उत्तर देऊ मी यांना आता..का काढला असावा मी यांचा फोटो ?
फोटो काढत असतांना..माझ्या मनात यांच्या विषयी प्रथम उमटलेली भावना काय होती?
थोडा कामात होतो..पण काहीही न बोलता निघून जाणं मला योग्य वाटत नव्हतं..
मी समोरील खुर्चीवर निशब्द; बसलो.
आणि थोडा विचार करायला लागलो..
आज्जी-आजोबा तुमच्याकडे पाहून खरचं मनातील ओलावा जिवंत झाल्यासारखे वाटले. आपले-पणाची चाहुल लागली..जीवनाच्या शेवटच्या प्रवासापर्यंत अगदी सोबत..
सांगायचे तात्पर्य एवढेच..
नाहीतर आज-कालची पती-पत्नी जुनी शिदोरी उपयोगात आणायची सोडून पिझ्झा बर्गर ब्रेकफास्ट करून तुझ-माझ ब्रेकअप करतात..
आज्जी-बाबांनी त्यावर अगदी सुंदर शब्दात उत्तर दिले..
ती भावना होती.तो काळ वेगळा होता.त्या काळातील दांपत्य जीवन हे सुसंवाद,परस्परांबद्दल प्रेम आणि विश्र्वास,पती-पत्नी नात्यांचा योग्य आदर यांनी ओतपोत भरलेलं होतं आणि म्हणुनच ते सुखी-संसाराची गाथा मांडत होते.
आजकाल मुलं ना..आई बापाला विचारत सुद्धा नाहीत त्यांच्या सोबत राहत नाहीत.
लाखो रूपये उधळून लग्न झाले न झाले वर्षा-काठीस वेगळे होतात.
स्वतःच्या स्वार्था पुढे कोणाचाही आदर नाही.. सन्मान नाही..रोजच्याच जगण्यात आजूबाजूला हेच पाहतोय आम्ही.
मी म्हणालो..पण मला ना,
तुमच्या या प्रवाहाकडे पाहून एक वेगळेच आंतरीक समाधान वाटले.मला माहित नाही तुमची मुलं,मुली किंवा नातवंड तुम्हांला सांभाळतात कि नाही पण तुम्ही एकमेकांना लावत असलेल्या जिव्हाळ्याने मी भारावून गेलो.. मि त्यांना म्हणालो..
तुम्ही उभ्या आयुष्यात खुप उन्हाळे-पावसाळे बघीतले असतील.कित्येक संकटे आली असतील, वाद-विवाद झाले असतील पण तुमच्या एक-मेकांच्या काळजी पुढं हे सारं नत-मस्तक झालं असावं.. असचं मला वाटतं.
दोघांनीही एकमेकांच्या डोळ्यात पाहीलं आणि मि त्यांच्याकडे पाहीलं
त्यांनी ओघळणारे अश्रू लपवले नाहीत..मोठ्या मनाने वाहू घातलेत..
ईतक्या निर्मळ मनाचे हे आज्जी-आजोबा मी आज-वर बघीतले नाहीत..
अगदी एक-मेकांसोबत.. जगायचे तर शेवटच्या श्र्वासापर्यंत..
दोघांनाही मोठ्या कौतुकाने मला एक एक घास भरविला आणि सुखी रहा असा आशिर्वाद दिला..आणि म्हणाले आयुष्यात खुप मोठा हो..!
पण आई-बापाला आणि समाजाला कधीही विसरू नको..त्यांचा सोबत जगण्याची मजा काही वेगळीच असते..