The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Priya Satpute

Inspirational Others

5.0  

Priya Satpute

Inspirational Others

पंचतंत्र...सुखी सहजीवनाचे!

पंचतंत्र...सुखी सहजीवनाचे!

5 mins
574


या आधी मी एक पंचतंत्र दिल होत ते म्हणजे, लग्नाआधीचे पंचतंत्र ! तो लेख प्रचंड वाचनात आला, खूप मेसेजेस आले, काहींचे फोन तर काहींनी त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या वळणावर मार्गदर्शक सूचना दिल्या बद्द्ल आभार तर काहींनी शाबासकी दिली होती. आज लग्नानंतरच्या सहजीवनाच्या पंचतंत्राबद्दल जाणून घेऊया तेही अगदी मोजक्यात, काय आहे ना उद्या सकाळी उठून रविवार स्पेशल नाश्ता बनवायचा आहे अन त्यानंतर प्रॉन्स पुलाव चा घाट देखील घातला आहे. चला तर मग मुख्य विषयावरच बोलू या...


भारत असो वा परदेश दाम्पत्य जीवनाचा फंडा १००% सेम आहे. ज्याला सुखी दाम्पत्य जीवनाचा मूलमंत्र गवसला तो साक्षात इंद्रदेवापेक्षाही श्रीमंत! आजकाल लग्न रेटत टिकवण्यासाठी भर दिला जातो, त्यापेक्षा ते आनंदाने, प्रेमाने देखील जगता येऊ शकते याचा विसर आताच्या आधुनिक पिढीला झाला आहे. त्यामुळेच आधुनिकीकरणाच्या नावाखाली पाश्चात्य लोकांच्या बाबींचे अनुकरण करताना लोक विसरत आहेत, पाश्चात्य लोकांच्या तुलनेत आपल्याकडेच घरगुती हिंसाचार, बलात्कार, ऍसिड भ्याड हल्ले अन घटस्फोटाचे प्रमाण वाढत चालले आहे. एक माणूस म्हणून आपण कमी पडत चालले आहोंत आणि म्हणूनच घर, प्रेम विरत चालले आहे. आपल्या पुढील पिढीला जबाबदार अन प्रेमळ पार्टनर घडवण ही प्रत्येक आईवडिलांची जबाबदारी आहे. पण, आपल्याकडे लग्नाआधीच मुलांच्या मातोश्री, पिताश्री प्रचंड असुरक्षित होऊन जातात, भलेही तो मुलगा दोन मुलांचा बाप का होईना! मुलगा आपल्याला सोडून देईल या भीतीपोटी नव्या मुलीला सतत जाणीव करून दिली जाते की हे तुझं घर नाही, तो माझा मुलगा आहे. एकेक मुलींना नवऱ्याच्या नकळत मानसिकदृष्ट्या इतकं अधू करून टाकलं जात की त्या मुली घरकोंबड्या बनून संपूर्ण आयुष्य खुरट्यात रखडतात अथवा स्वतः ला संपवून टाकतात. मुलाच्या आयुष्यात आमचे प्रथम स्थान च्या शर्यतीत हरते कोण? सून? मुलाचं सुखी दाम्पत्य जीवन ? नवी पिढी? अर्थात नवी पिढी! 


गेले कित्येक वर्ष, होणाऱ्या नव्या पिढीसमोर आपण काय आदर्श ठेवत आहात? लग्नाचा अर्थात सहजीवनाचा? लग्न नको म्हणून पळणारे कित्येक मित्रमैत्रिणी अजूनही अविवाहितच आहेत, का? श्रेष्ठ कोण याची चढाओढ? लग्नानंतर ३६० अंशात बदलणारे नातं? की नवरा बायको चे आईवडील बनून रटाळ आयुष्य जगायला लागेल याची भीती? की आयुष्यच संपेल अन जे आपल्या आईवडिलांना भोगाव लागलं तेच पुनरावृत्ती? अश्या शेकडो प्रश्नांच जाळ आपल्याला त्यात ओढत राहत अन माणूस नकारात्मक विचार, मन या सगळ्यांपुढे हतबल होऊन सुखी सहजीवनाला मुकतो! 


आई नावाचं जे वलय आहे त्याची जागा अढळ आहे. अन बाबा हा त्या वलयाचा केंद्रबिंदू आहे. पण म्हणून का तुम्ही वयाची चाळीशी गाठलेल्या मुलाला अजूनही लहान मानून सुनेला पोक्त बाई करून टाकाल का? ती त्याची सहचारिणी आहे, तिला तो मान मिळालाच पाहिजे. पण तसे का घडत नाही? कारण, मुलांवर केंद्रित झालेले आईवडील त्याला एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून पाहतच नाहीत. आईवडिलांना त्यांचं सहजीवन मुकलेलं असलं की गफलत सुरू होते ती अशी, मुलांना दोघांच्या मध्ये झोपवून नवरा बायको त्यांच्या शारीरिक गरजा नव्हे तर मानसिक गरजांना मुकतात हे कटुसत्य आहे. नवरा बायको हे काही रूममेट्स आहेत का? दिवसातले खच्चून अर्धा तास ते एकमेकांना वेळ देतात, त्यातही एकमेकांशी भावनिक पातळीवर बोलण शून्य आणि त्यामुळेच कदाचित आजकाल लग्नाला अनैतिक फाटे फुटू लागले आहेत. यात भर म्हणजे, मानसिक सुख नसल्याकारणाने माणूस घरी सुरुंग घेऊनच फिरत असतो, काही मनासारखं नाही झालं अथवा कोणी काही बोललं की लगेच गृहक्लेश सासू सून सुरूच अन त्यात भर म्हणजे घरात धुरळा करणाऱ्या त्या मालिका! 


खरे तर लग्न टिकवणे हे फार काही अवघड नाहीये, अवघड म्हणण्यापेक्षा आवाहनात्मक हे आहे की सध्याचा क्षण आनंदाने उपभोगता आला पाहिजे, सहजीवनाची ट्रेन पकडून, नव्या आव्हानांना एकत्रपणे प्रेमाने सामोरे जाता आले पाहिजे. सुखी सहजीवनाला तारून नेणारी पंचसूत्री ती अशी,


१. लक्षात ठेवा आयुष्यात प्रत्येक व्यक्तीच वेगळं स्थान असतं! आईवडील हा कप्पा कोणीच हिरावून नेत नाही याची जाणीव तुमच्या आऊसाहेबांना जितक्या लवकर करून द्याल ते बरे! कारण, ज्या प्रकारे तुमचे आईवडील आहेत तसेच तिचे सुद्धा आहेत, तरीही स्वतः ची सगळी नाती मागे टाकून ती तुमच्या सोबत आली आहे. ज्या प्रकारे तिने तिच्या प्रायोरिटी लिस्टवर प्रथम क्रमांक तुम्हांला दिला आहे, साहजिकच तुम्हीही देणं गरजेचं आहे. कोणाच्याही पुढ्यात पार्टनरला अपमानास्पद बोलू नका, काही सांगायचेच झाले तर एकांतात सांगा! म्हणतात ना, गुण सांगावेत चारचौघांत अन अवगुण एकांतात!


२. तुमच्या मुलांना स्वतंत्र व्यक्ती म्हणून जगू द्या! स्वतंत्र खोली, त्यांना त्यांची स्पेस द्या, आत्मनिर्भर अर्थात त्यांना स्वावलंबी बनवा. तुम्ही सतत त्यांना आईच्या पदराखाली ठेवणार का? त्यांना त्यांचं आकाश गवसण्यासाठी तयार करा! सध्याचा काळ वेगाचा आहे, त्यांना पंख फेलावून उडू द्या. सतत त्यांच्यात गुंतून पडाल तर तुमच्या पार्टनरशी काय बोलाल? आयुष्य कंटाळवाण होऊन जाईल. स्वतः अन आपल्या पार्टनर साठी मोकळेपणाने जगा. सतत मुलांच्या आयुष्यात लक्ष दिल्यामुळे कुरबुरी वाढतात अन घरचे वातावरण कलुषित होते, बीपी वाढतो, कमी होतो म्हणून लग्न झालेल्या मुलांच्या मुलींच्या मध्ये न गुरफटलेले बरे, त्यांना त्यांच्या पार्टनर सोबत मनमोकळेपणाने जगू द्या! तुम्हीच उदाहरण बनून जा नव्या पिढीसाठी! द्वेषाने जवळ राहण्यापेक्षा, प्रेमाने लांब राहणे कधीही चांगले!


३. तुमच्या पार्टनरला गृहीत धरू नका! गृहीत धरणे अन समजून घेणे या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. या गृहीत भाऊंनी भलेभले लोकांना फॅमिली कोर्टाच्या पायऱ्या चढवल्या आहेत. कधी एखाद्या संडे बायकोसाठी एक कप चहा जरी कराल तर पहा पूर्ण दिवस ती वेगळयाच दुनियेत असेल. रोज सकाळी तोंडांचा पट्टा सुरू करणाऱ्या बायकोने एक दिवस तरी शांत राहून नवऱ्याला सुखद धक्का द्यावा मग पहा, तुमची तणतण होण्याआधीच सारी कामे पूर्ण होतील. 


४. प्रेम करता हे कबूल पण, ते दाखवालंच नाही तर काय उपयोग? समोरची व्यक्ती थोडी अंतर्मनाच्या भाषा जाणते! स्वतः च्या मुलांसमोर एक हेल्दी रिलेशनशिप कसं असतं याच उदाहरण ठेवा म्हणजे भविष्यात त्यांचा कोणीही गैरवापर करणार नाही. मिठी हे प्रेम आणि सुरक्षिततेच अद्भुत उदाहरण आहे. मुलांच्या समोर प्रेम व्यक्त करण्यात काहीही गैर नाही हे लक्षात ठेवा! उलटा तुम्ही तुमच्या मुलांना भावी आयुष्यात योग्य प्रेमळ नात कसं असत हे दाखवून द्याल! 


५. तुमच्या नात्याला चिरतरुण ठेवण्यासाठी नेहमी प्रयत्न करा. आपल्या पार्टनरच्या आवडी निवडीचा विचार ठेवा. लॉंग ड्राईव्ह, डेट्स वर जाण, एकमेकांना सरप्राईज देणं, स्वतः च्या ईच्छा आकांशा मनमोकळेपणाने आपल्या पार्टनरशी शेयर करणं. एकमेकांवरच प्रेम आईवडील, मुले, मित्रमैत्रिणी यांच्यासमोर बोलून दाखवण्यात एक गुलाबी भावना आहे जी प्रत्येक स्त्रीमध्ये वयाच्या कोणत्याही वर्गात असो असतेच. 


लास्ट बट नॉट लिस्ट... आपले काम, हुद्दा, मुले, आईवडील, भाऊ बहीण, नातेवाईक, मित्रमैत्रिणी कितीही महत्त्वाचे असले तरीही या सर्वांच्या पलीकडे अन अत्यंत महत्त्वाचे नाते असते ते आपल्या जोडीदाराशी! आपल्या नात्याला सुखी सहजीवन बनवण्यासाठी कोणतेही सिक्रेटस ठेऊ नका, एकमेकांना मान, प्रेम आणि वेळ द्या! जेणेकरून भावी पिढीला सुखी सहजीवन काय असते हे तुमच्या मार्फत उमगेल!


Rate this content
Log in

More marathi story from Priya Satpute

Similar marathi story from Inspirational