STORYMIRROR

Arun Gode

Children Stories

2  

Arun Gode

Children Stories

सुदृढ बालक

सुदृढ बालक

5 mins
137

        एका मध्यम मोठ्या कुंटुंबातील सर्वात धाकट्या मुलीचे संपूर्ण लहानपण आई हयात नसतांना तिच्या तीन-चार वडिल भाऊंच्या व वडिलांच्या देखरेखेत झाले होते.ती सर्वात लहान असल्यामुळे, ती भावांच्या व वहिणींच्या लाडातचं मोठी झाली होती. आई नसल्यामुळे तीला घर कामांची सवय कोणी फारशी लावली नाही. तीचे सर्व भाऊ छोट्या- मोठ्या सरकारी ,अर्धसकारी किंवा खाजगी ठिकाणी नौक-या करत असे. त्यांच्या पगारत त्यांचे फक्त स्वतःचेच कुटुबचं जगने अशक्य होते. चिंध्या वेचलेल्या अन गोदडया शिवलेली परिस्थिति होती. वडिलांची थोडीफार पेंशन मिळत होती. त्यामध्ये काही घरातील आवश्यक कार्य करण्यास आर्थीक मदत होत होती. नकटिच्या लग्नाला सतरा से साठ विघ्न ,वय झाल्यामुळे वडिलांचे दुःखद निधन झाले होते.परिवार फार आर्थीक संकटात अडकला होता. खायला कोंडा अन झोपायला धोंडा. परिवारातील सारख्या गरजा, मुल-मुली मोठे होत असल्यामुळे वाढतचं चालल्या होत्या. आता बहिन वयात आली आहे. तीचे वय वाढत आहे.त्यामुळे तीचे लग्न करुन दिले पाहिजे असे कुंटुंबातील सर्वांना वाटत होते.लग्न करायचे म्हणजे पैसा लागनारचं. तो पैसा कोणी लावयचा हा प्रश्नपरिवारा समोर भेडसात होता. भाजारत तुरी,आणी भट भटणीला मारी. लग्नाच्या संकटामुळे घरातील वातावरण दुषित झाले होते.तीचे सर्वच भाऊ एकच विचारात होते कि कसे तरी हीचे लग्न करुन टाकावे. एक वेळ कळ सोसुन विहीर उपसावी पण धाकली नणंद नकटी नसावी. तीच्या सर्व वहिणींना नंदेचे लग्न म्हणजे एक अनावश्यक मोठे ओझे वाटत होते. अनाशे एका परिचिताने एक स्थळ त्यांना सुचविले होते. मुलगा फारसा शिकला नव्हता. अभ्यासात त्याचे डोके काम करत नव्हते म्ह्णुनं त्याने आय.टी.आय मध्य फिटर मॅन चे प्रशिक्षण घेतले होते. त्यामुळे त्याला गांवातील कारखाण्यात नौकरी मिळाली होती. वडिल पण त्याच कारखाण्यात बाबु होते. त्यांनी गावांत दोन माळाचे घर बांधले होते. मोठे वाडे व पोकळ बाशे अशीच परिस्थिति होती.त्यांच्या मोठ्या मुलीचे लग्न झाले होते. तील मुळ-बाळ पन होती. घरात अजुन एक लहान भाऊ होता . तो शिकत होता.परिवार साधारण संपान्न व खुपच काट-कसरी होता. लग्नाची मुलगी मॅट्रिक पास झाली होती. बघायला फार सुंदर होती. कदाचित आई-वडिल जीवंत असते, तर चांगला खात्या-पित्या घरी संबंध जोडला असता !.


      अनायशे स्थळ घरी चालुन आले होते. जास्त आटा-पिटा न करता . तीच्या भावांनी तीचे हात पिवळे करुन दिले होते.आर्थीक तंगीमुळे ते वर पक्षाचा रिती-रिवाजा प्रमाने मान-सम्मान करु शकले नाही. त्यामुळे वर पक्षाचे सर्वच जन नाराज झाले होते. त्यामुळे सुनेला घरात फारसा किंमत नव्हती.तीच्या बोलन्याला व करण्यालाकाही वजन नव्हते. सासु-सासरे व पती पण तीचा सारखा तीरस्कार करत असे. कुंटुंब पहिले पासुनचे फार काट-कसरी, चिकट, शिस्तबध्द होते. घरातील सर्व कामे घरातील माणसेच करतील अशी पध्द्त त्या घरात होती.नविन आलेल्या सुनेला फार घर कामाचा माहिरी सर्वात लहान असल्यामुळे अनुभव नव्हता. ती घर काम करु-करु जनु घरची मौलकरीन वाटत असे. वरुन सासु-सासरे यांचे तिखट टोचुन बोलने आनी पतीची अकारण मारहाण होत असे.पाण्यात राहुन मगरा सोबत वैर नको. त्यामुळे ती सर्व सहन करत होती.तीचा पती बुध्दि ने फार हुशार,व्यवहारिक नव्हता.त्यामुळे आई-वडिल व लहान भाऊ जे म्हणतील ती त्याचीपूर्व दिशा होती. पति-पत्नि त्या घरात नुसते काबाड-कष्ट करनारे रोजनदारच होते. त्यची पत्नी शिकली असल्यामुळे ती त्याला समजावण्याचा प्रयत्न करित असे.छोट्या शिल्लक कारणा वरुन पति-पत्नि मध्य जोरदार भांडण होत असे.पण तीला माहेरचा फारसा पाठिंबा नसल्यामुळे ती सर्व छ्ळ सहन करित असे.आपलेच ओठ आणी आपलीच जीभ. तीला नंतर एक मोठा मुलगा व दोन मुली झाल्या होत्या. मधली मुलगी इतर दोन मुला पेक्षा जास्त सुदृढ होती. 


    आता घरातील कनिष्ठ मुलाचे पण लग्न झाले होते. घरातील महोल बघुन, धाकली सुन लगेच सावध झाली होती. चालक असल्यामुळे तीने घराची जवाबदारी घेतली होती. त्यामुळे तीची घरात फार किंमत वाढली होती.पन मोठ्या सुनेचा रुतवा घरात एका मौलकरीनी पेक्षा जास्त नव्हता.ती फार हिमतीने आपले दिवस आंनदाने काढत होती.आपल्या कुटुंबासाठी परिश्रम करणे तीला चुकिचे वाटत नव्हते.तीचे रहन-सहन एखाद्या अशिक्षीत गबाळ बाई सारखेच होते.त्या घरात तीच्या श्रमाची कोणालाही किंमत नव्हती. पावसाने भिजलेली, अन नवर्याने झोडपलेली तर सांगनार कोणाला ?. तिची मधली मुलगी, सुंदर , शरिराने सुदृढ होती. ती फारच चंट होती. ती सारखा घरात व मोहल्यात काहीना-काही, नेहमी उपद्रव करत असे.सुदृढ व चंट, खोडकर असल्यामुळे मोहल्यातील इतर समवयस्क मुली-मुले तीच्या धाकात असतं. ती शाळेत पन तसीच चंट होती.


        प्राथमिक शाळेत मधे, एक्दा शिक्षण अधिका-या,ने विद्यार्थांसाठी एक स्वास्थ संबंधी सर्वक्षण केले होते. त्यात शाळेती मुला-मुलीचे शारिरीक क्षमतेचे परिक्षण करण्यात आले होते.त्यात त्या मुलीचे, गांवातील शालळेतील सर्वात सुदृढ बालक म्हणुन निवड झाली होती. आता तिचा रिपोर्ट जिल्हास्तर वरच्या कार्यालयात पाठवण्यात आला होता.जिल्हास्तरच्या शिक्षन अधिकाराने अशा सर्व मुलांना, मुख्य जिल्हा स्तरिय कार्यालयात पाचरनण करुन त्यांचा त्यांच्या पालका सोबत सम्मान करन्याचे ठारवीले होते. त्या करित एका सहमती पत्रा वर सही करुन पाठवयाचे होते.म्हणुन शाळेतील शिक्षिकेने एक चपराशाला त्या मलीच्या घरी बोलाने पाठवले होते. त्या चपराशाने कशे साठी बोलावले हे सांगितले नव्हते. असा घरी निरोप आल्यामुळे घरातील लोकांचा गोंधल उडाला होता. सर्वांना अशी अपेक्षित होते कि मुलीने काही तरी असे महान कार्य केले आहे. त्यामुळे मुख्याध्यापिकाने बोलवले आहे, ह्या भितिने शाळेत, घरातील कोणीच जवाबादार व्यक्ति जायला तयार नव्हती. शेवटी मुलीची आई , भांडे साफ करता-करता त्याच स्थितित शाळेत गेली. मुख्याध्यापिकेच्या कम-या समोर उभी राहली होती.चपराशाने संबंधीत मुलीची आई म्हणुन ओळख करुन दिली.आईचा अवतार व घातलेले कपडे पाहुन तीला संबंधीत कागदावर अंगुठा लावन्यासाठी सांगितले होते. मुलीच्या आईच्या लगेच लक्षात आले कि आपला हा अवतार बघुन , मुख्याध्यापिका आपल्याला अंगुठाछाप समजुन आंगठा लावायला सांगत आहे. तीने मुख्याध्यापिकाला सही करण्यासाठी पेन मागितला होता. एक्दम अचंबित होवुन, तीने तीला पेन दिला. तीला वाटले, आपाले नांव वैगरे कदाचित लिहता येत असावे. पेन दिल्यानंतर तीला अशी अपेक्षा होती कि, कुठे सही करायची असे ती प्रश्न करेल! ?.पन मुलीच्या आईने संपूर्ण काद वाचुन काढला होता. आणी म्हणाली, माझ्या मुलीला सुद्रुढ बालक म्हणुन मोठे साहेब सम्मानित करनार आहे. असे वाटते.ती हसत – हसत म्हणाली अहो, आमच्या मुलीला नेमकी खोडकर मुलाचा सम्मानची आम्हला अपेक्षा होती. चर्चा करतांना, मुलीच्या आईन इंग्रजीत एक शेरा मारला होता व चक्क इंग्रजीतच सही केली. हे बघुन अक्षरशाह मुख्याध्यापिकाला चक्करच आला होता. त्यांनी स्वतःला सांभाळुन, तीला बसण्यासाठी खुर्ची दिली होती. त्याकाळात फारशा गृहिणी शिकल्या राहत नव्हत्या. मुख्याध्यापिका पन जास्त शिकल्या नव्हत्या. सेवानिवृत्तीच्या जवळ-पास पोहचल्या होत्या.वरिष्ठ शिक्षिका असल्यामुळे मुख्याध्यापिका झाल्या होत्या. समाजात व परिवारत स्त्रीला सम्मान, संधी जर मिळाली नाही तर स्त्रीचे जीवन कशे बेकार व अपमानीत होते याचे हे जीवंत उदाहरण आहे. रडगाणे आवरेना अन नव-या वाचुन करमे ना. तीच्या या परिस्थितिला तीचाच मुर्ख नवरा म्हणांयला काहीच हरकत नाही.


Rate this content
Log in