Jyoti gosavi

Others

5.0  

Jyoti gosavi

Others

स्त्री

स्त्री

2 mins
1.0K


"नारी नारी मत करो नारी नर की खाण

उस नारी से जनम लियो स्वयम् विष्णु भगवान"


खरे तर विचार करता आज जागतिक पुरुष दिन, आणि आजचा विषय आहे "स्त्री एक प्रेरणा" एका अर्थी विचार केला तर आजचा विषय बरोबरच आहे. कारण प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो मग तो आईचा असेल, मैत्रिणीचा असेल बायकोचा असेल, बहिणीचा असेल. स्त्रीची विविध रूपे आहेत. ती कधी आई असते बहिण, काकी, मामी, आत्या, मुलगी, भाची, पुतणी, मैत्रीण आणि पत्नी अशा विविध नात्यांनी ती पुरुषाबरोबर बांधलेली असते. म्हणतात ना! "स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता असते" आपल्या विविध रूपातून ती पुरुषाच्या प्रेरणेचा शोध बनते. जिजाऊच्या प्रेरणेने शिवबांनी शून्यातून साम्राज्य उभे केले.


द्रौपदी मोकळे केस सोडून सतत पांडवांना चिथावत राहिली, युद्धाची प्रेरणा देत राहिली त्यामुळे पांडवांनी गेलेले राज्य पुन्हा मिळवले. सीता रावणाने पळवून नेली त्यामुळे तिला परत मिळवण्यासाठी का होईना पण रामाने अशक्य ते शक्य केले व समुद्रावर सेतू बांधून अपराजित लंका पराजित केली. ट्राँयचे युद्धदेखील एका स्त्रीसाठी झाले होते. स्त्री ही घरादाराचा, कुटुंब व्यवस्थेचा कणा आहे. अगदी शेतीच्या शोधापासून ते आजकालच्या करिअर करणाऱ्या मुलींपर्यंत घर आणि नोकरी या दोन्ही आघाड्यांवर यशस्वीपणे स्त्री लढते. स्त्रीमुळे कुटुंब व्यवस्था निर्माण झाली तत्पूर्वी मनुष्य रानटी होता.


मुलांवर चांगले वाईट संस्कार आईच करत असते. त्याच्या भल्याबुऱ्या वागण्याला आई म्हणजे एक स्त्रीच जबाबदार असते. निसर्गाने तिला शरीराने कमकुवत केले पण मनाने खंबीर केले. कोणत्याही संकटकाळी ती डगमगत नाही. आपण शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाचतो, परंतु त्याच्या माघारी त्यांच्या पत्‍नीने आत्महत्या केल्याचे कधी वाचले आहे का? उलट त्याच्या पाठीमागे आपला संसार ती खंबीरपणे सांभाळते.


कसं काय जमतं तुला? सारी नातीगोती निभावणं, सारी नातीगोती सांभाळून सर्वांशी प्रेमाने वागणं. आणि प्रत्येकाच्या मनात नेमकं काय आहे ते ओळखणं कसं जमतं तुला? सर्वांशी हसतमुख राहून आल्यागेल्याचं स्वागत करण. कसं जमतं तुला अखंड प्रेरणेचा स्रोत बनून राहण प्रसंगी खंबीर होणं, संकटात पुरुषाची ढाल बनणं आनंदात त्याच्या पाठी राहणं...


सखी प्रिया अभिसारिका आणि तू माता जननी

तुझ्यावाचून गडे व्यर्थ ही सारी अवनी 

तुझ्यावाचून गडे शून्य साऱ्या त्रिभुवनी

अशी तू या जगाची अनभिषिक्त राणी


Rate this content
Log in