Vasudha Naik

Others

2.4  

Vasudha Naik

Others

*सोशल मिडिया व तरूणाई

*सोशल मिडिया व तरूणाई

1 min
455


लहान थोर सारेजण

वेड लागले इंटरनेटचे

अंगठे फिरतात भराभर

ज्ञान मिळते चोहिकडचे...


आजकाची तरूण पिढी काय किंवा लहान मुले काय ? सारी सारखीच ...सर्वांच्या हातात एक खेळणे असते. त्याचे नाव मोबाईल. यावर सर्व जगाचे ज्ञान अवगत होते.

   किबोर्डवर बोटे फिरताच

   ज्ञानाचे भांडार खुले होते

   यू ट्युब वर सर्च करताच

   जे हवे ते मिळून जाते..

नवनवीन अँप प्लेस्टोअर मधून डाऊनलोड केले की शैक्षणिक माहिती,सामाजिक माहिती,बौद्धिक खुराक,कविता इत्यादीचे ज्ञान मिळते.

   जगात काय चाललेय याचे अचूक ज्ञान मिळते.

   बातम्या आपण आत्तापर्यंत वर्तमानपत्रात वाचत होतो.आज वर्तमानपत्रच डिजिटल झालेय .याचा लाभ हीतरूण पिढी करून घेते.नोकरीमुळे या मुलांना घरी वेळ मिळत नाही बारा बारा तास नोकरीच्या ठिकाणी असतात.अशा वेळी डिजिटल तंत्रज्ञानाचा खूप उपयोग होतो.

   पण हीचतरूणाईजर तंत्रज्ञानाच्या वाईट नादाला लागली तर आख्खी पिढी बरबाद होताना दिसते. 

    काही सेक्सचे व्हाडिओ पाहून तरूणाई चलबिचल होतेय. यातूनच बलात्कारासारख्या अत्यंत घृणास्पद काम तरूणाईकडून होताना दिसते.

  तसेच मुलींची फॅशन या चित्रपटांच्या व्हिडिओमुळे बळावली आहे .त्यातूनच ही पिढी जरा बिनधास्त वागतेय. पण हे सर्व हानिकारक होतेय.

   हल्ली व्हाॅटसॅपच्या या सोशल मिडियामुळे अनेक चांगल्या बाबी होतानाही दिसतात.अनेक चांगले समूह आसतात .अॅडमिन छान काळजी घेतात समूहाची.   

    सोशलमिडिया छान आहे त्याचा योग्य वापर केला तर आजची तरूणाई गगनभरारी नक्कीच घेईल .

   अपडेटेड माहितीमुळे तो सदैव अपडेट राहतोय, सर्व सुविधांचा उपयोग घेतोय. काही ठिकाणी याचा अतीवापर केल्याने या भौतिक सुखांची सवय होतेय. माणूस प्रगती तर करतोय पण अती वापरामुळे त्याची अधोगती होऊ नये ही इच्छा!

  या सुविधांचा वापर योग्य करा तरूणांनो....आणि जीवनाचा आनंद उपभोगा....


Rate this content
Log in