नासा ( NaSa ) येवतीकर

Others

2  

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

स्मृती व विस्मृती

स्मृती व विस्मृती

2 mins
155


निसर्गाने मानवाला एक अनोमल देणगी दिलेली आहे ती म्हणजे बुद्धी. यामुळे आपण बऱ्याच गोष्टी आठवणी मध्ये ठेवू शकतो तर काही गोष्टी विसरून देखील जातो. स्मृती म्हणजे आठवण ठेवणे आणि विस्मृती म्हणजे विसरून जाणे. शक्यतो आपण आनंदाच्या गोष्टी आठवणीत ठेवण्याचा आणि दुःखाच्या गोष्टी विसरून जाण्याचा प्रयत्न करत असतो. पण नेमके उलटे घडत असते. दुःखाच्या गोष्टी आठवण सोडत नाहीत आणि सुखाच्या गोष्टी कालांतराने विसरत जातो. काही गोष्टी आपण विसरत जातो म्हणूनच चांगले जीवन जगू शकतो. साऱ्याच गोष्टी जर आठवणीत राहिल्या असत्या तर मेमरी फुल्ल होऊन डोकं हॅग झाला नसता का ? तरी देखील आपण काही गोष्टी कायम लक्षात ठेवत असतो जसे की आपला जन्मलेला दिवस, शाळेतले काही गमती जमती, नोकरीला लागलेला पहिला दिवस, लग्न झालेला दिवस आणि जीवनातील काही घटना जे की आपण कधीच विसरत नाही. त्याचसोबत काही दुःखांच्या अशा घटना घडतात जे की आपण विसरू शकत नाही. आपल्यावर आभाळ कोसळलेले क्षण लगेच विसरत नाही पण काळ जसा जसा पुढे सरकतो तसे ती घटना विस्मृतीमध्ये जाते. मनाला दुःख देणाऱ्या घटना हळूहळू विसरत गेले तरच आपण जीवन जगू शकतो अन्यथा आपल्या डोक्यावर खूप ताण येऊन जीवन असह्य होऊन जाते. निसर्ग देखील उन्हाळ्यात पार सुकून जातो आणि पावसाळ्यात परत सर्वत्र हिरवेगार होतो. असाच काही अनुभव माणसांच्या जीवनात येत असतो. दुःखानंतर सुख आणि सुखानंतर दुःख हा निसर्ग नियमच आहे. म्हणून काही गोष्टी स्मृतीमध्ये आणि विस्मृतीमध्ये ठेवणे आवश्यक आहे. 

काही लोकांना दैनंदिन डायरी म्हणजे रोजनिशी लिहिण्याची सवय असते. यामुळे डायरी वाचतांना डोळ्यासमोर जशास तसे अनेक गोष्टी उभे होतात. डायरी लिहिणे चांगली गोष्ट आहे, त्याची थोडीफार सवय आपणाला असावीच. अशीच एक डायरीचे काम सोशल मीडियातील फेसबुक हे करीत असते. मागील वर्षी आजच्या दिवशी तुम्ही काय पोस्ट केलात ते लास्ट मेमरी मध्ये ते आठवण करून देते. त्यास्तव हा एक चांगला पर्याय आहे डायरी म्हणून आपली आठवण जतन करून ठेवण्याचा. या मीडियाचा वापर आपण आपल्या जीवनातील काही घटना नोंद करून ठेवण्यासाठी केल्यास खरा उपयोग केल्याचा आनंद होईल.


Rate this content
Log in