Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

श्वास

श्वास

1 min
31


 बाळ जन्माला आले की श्वास घ्यायला सुरुवात करते. ते वृद्ध झाल्यानंतर पानागळी प्रमाणे त्याचा श्वास बंद होतो.

  सुरुवातीचा श्वास आणि अखेरचा श्वास यामधील जो काळ त्याला पण जीवन असे म्हणतो.

  जीवनात अनेक चढउतार येत असतात. कोणाचे जीवन कष्टाळू असते, कोणाचे खडतर असते कोणाचे सुखमय जाते. तर कोणी कितीही कष्ट घेतले जीवनामध्ये आनंद उत्सव येतच नाही. त्यांचे जीवन काट्याने भरून ठेवलेले असते. तर काहींचे जीवनामध्ये एवढे सुख असते एवढे सुख असते ती त्यांना रात्रीची झोप मिळत नाही. इतर आजाराने त्यांना वेढलेले असते.

  मानवाचा जीवन प्रवास असाच चालू असतो. कधी सुखाची सावली तर कधी दुःखाचं सावट. सुखदुःखाच्या या हिंदोळ्यावर बसता,बसता आपले जीवन कधी संपून जाते याचा मागमूस सुद्धा आपल्याला लागत नाही.

  देवाची ही निरामय कल्पना आहे. आणि ह्या कल्पनेचे आपण प्यादे आहोत. देवाने दिलेले हे जीवन कष्ट करत जगायचे, खरे पणाने पुढे जायचे. इतरांना आनंद द्यायचा आणि घ्यायचा. समाजातील आपले स्थान उंच करायचे. देशासाठी आपले कार्य करायचे. निसर्गाचे ऋण मानायचे. वृक्ष लागवड करायची. निसर्ग संपत्ती जपून ठेवायचा प्रयत्न करायचा. स्वतःचे अस्तित्व निर्माण करायचे. इतरांच्या अस्तित्वाला लावायचा नाही. एकमेकांच्या साथीने पुढे जायचे. देवाने दिलेले जीवन आनंदाने जगायचे. एवढे छान जीवन दिले आहे देवाने रडतकडत कशाला जगायचे? आनंदाने उपभोगायचे.

   चला तर मग श्वास बंद होण्याआधी आपण छान जीवन जगायला शिकूया. आनंदाचे घट भरून घेऊन ते वाटायला शिकूया.

  नको ते हेवे- दावे    

 आनंदाने जीवनमार्ग क्रमण करावे.


Rate this content
Log in