Jyoti gosavi

Others

2  

Jyoti gosavi

Others

श्रीकृष्णाची राणी सत्यभामा

श्रीकृष्णाची राणी सत्यभामा

5 mins
614


सत्यभामा कृष्णाच्या अष्ट राण्यांपैकी एक, लाडकी राणी. बाबूजींच्या एका गाण्यांमध्ये


"माना मानव, वा परमेश्वर

 मी स्वामी पतितांचा

 भोगी म्हणूनी उपहासा

 मी योगी कर्माचा"


 त्यामध्ये एक ओळ आहे. 


किंचित हट्टी ,परंतु लोभस

असे सत्यभामा 


सत्यभामा म्हणजे मानवी भावनांचे प्रतीक, मानवांमध्ये जसे हेवेदावे, मीच कशी मोठी, या गोष्टी सत्यभामेने कडे होत्या. थोडक्यात मानवी भावभावनांचे प्रतीक म्हणजे सत्यभामा. 


सत्यभामा ही सत्राजीताची मुलगी .ही मुळात शतधन्वा नामक यादवाला  दिली होती. सत्राजीत सूर्य उपासक होता. त्याच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन सूर्याने त्याला दिव्य "स्यमंतक" मणी दिला होता. तो म्हणे दररोज ,अठरा भार सोने प्रसवत असे . त्यामुळे तो सत्राजित सतत "स्यमंतक " गळ्यात घालून फिरत होता. 


असाच एकदा तो यादव सभेमध्ये आला असता, त्या मण्याची ख्याती ऐकून, कोणातरी यादवाने तो श्रीकृष्णाला देण्याबद्दल सुचवले .

त्याचा सत्राजिताला खूप राग आला, आणि तो यादव यांच्या दरबारात येण्याचे बंद झाला. तो मणी त्याने आपल्या देव्हाऱ्यात पूजेला ठेवला, त्यानंतर त्याचा लहान भाऊ प्रसेन तो मणी गळ्यात घालून जंगलात शिकारीला गेला, त्या मण्या चे तेज एवढे होते की, सूर्याचे किरण त्याच्यावर पडले आणि दरीतील सिंह खवळला, तो मण्याच्या रोखाने आला, आणि झडप घालून प्रसेनाला ठार केले, तो मणी सिंह घेऊन जात असताना, जांबुवंताने पाहिले ,आणि त्याने सिंहाला एका बुक्कीत मारून तो मणी घेऊन आपल्या मुलीच्या जांबुवंती च्या पाळण्यावरती टांगला. 


मग पुढे तो आज आळ श्री कृष्णा वरती आला ,आणि त्याने त्या मण्याचा शोध घेतला, त्यासाठी जांबुवंताशी युद्ध केले, जेव्हा जांबुवंताला कळले की, हा  गेल्या जन्मीचा राम अवतार आहे, आणि त्याची युद्धाची इच्छा पूर्ण करण्यासाठीच या गोष्टी केल्या. (जेव्हा लंका विजयानंतर सीतेला अग्निदिव्य करण्यासाठी सांगितले, )तेव्हा जांबुवंताला खूप राग आला होता ,आणि त्याने छाती पिटत सांगितले की, "रामा" आधी माझ्याशी युद्ध कर, आणि मगच सिता माईला अग्निदिव्य करायला सांग, तेव्हा तुझी ही इच्छा मी पुढील अवतारात पूर्ण करेन असे वचन रामाने दिले होते. व ते पुरे केले. त्यानिमित्ताने जांबुवंती शी लग्न करावे लागले, तो मणी सत्राजीताला परत दिला ,तेव्हा त्याला आपण कृष्णावर चोरीचा आळ घातला, याची लाज वाटली. आणि त्याने सदर मणी आणि सत्यभामा दोन्ही श्रीकृष्णाला अर्पण केले. अशा रीतीने सत्यभामा आणि स्यमंतक दोन्ही श्रीकृष्णाच्या आयुष्यात आले. तो मणी सत्यभामेच्या घरी होता तो दररोज दोन भार सोने प्रसवत असे, त्यामुळे सत्यभामेला फारच गर्व झाला.

श्रीकृष्णाची मी लाडकी राणी

 आणि माझ्या घरात स्यमंतक मणी


ती सतत रुक्मिणीशी बरोबरे करत असे रुक्मिणी पट्टराणी आदिमाया तिच्या मनी हे षडरिपू नव्हतेच परंतु सत्य मामाची मात्र त्यातून सुटका नव्हती . 


बहरला पारिजात दारी

 फुले का पडती शेजारी


  या गाण्याच्या अनुषंगाने एक पारिजातकाचे फुल रुक्मिणीला दिले ,म्हणून सत्यभामा रुसली आणि मग श्रीकृष्णाने आख्खा पारिजात आणून तिच्या दारात लावला. पण मग पारिजात माझ्या दारात आहे ,पण फुले मात्र शेजारणीच्या अंगणात का पडतात ?

ही शेजारीण म्हणजे रुक्मिणी! असाही तिच्या मनातला वाद-संवाद हरी विजय मध्ये दाखवला आहे.


  त्यानंतर नरकासुराच्या वधाच्या वेळी हट्टाने त्याच्या बरोबर युद्धाला गेली, अर्थात नरकासुराचा मृत्यू एका स्त्रीच्या हस्ते होणार असल्यामुळे श्रीकृष्णाने देखील तिची इच्छा पुरवली. त्यानुसार नरकासुराचा वध देखील झाला. पण येताना सोळा हजार 100 राजकन्या तो सवे घेऊन आला. त्यावेळी देखील सगळ्या पट्ट्या राण्यांनी सत्यभामेच्या उद्धार केला, तू किती शहाणी ,ते माहित आहे ! 

युद्धाला म्हणून सोबत गेलीस आणि सोळा हजार शंभर सवती बरोबर घेऊन आलीस


 अजून एक प्रसंग आहे, श्रीकृष्णाच्या आणि सत्यभामेच्या आयुष्यातला. ती म्हणजे श्रीकृष्णाची सुवर्ण तुला, 


एकदा तिने नारदाला विचारले, जन्मोजन्मी मला "श्रीकृष्ण" हाच नवरा मिळावा म्हणून मी कोणते व्रत करावे ?तेव्हा नारदाला प्रश्न पडला, प्रत्यक्ष भगवान श्रीविष्णूशी तिचे लग्न झाले आहे ,पण हिला पुढे जन्मपंक्ती पाहिजे आहेत. पुढे प्रपंच पाहिजे आहे, म्हणजे ही किती अज्ञानी आहे. 

त्यासाठी तिला मोह मायेतून जागे करण्यासाठी नारदांनी असे व्रत सांगितले की ,तू श्रीकृष्णाला कोणालातरी दान दे ,तर तुला जन्मोजन्मी तो मिळेल. आता तिला हे समजायला पाहिजे होते की, त्याला जर दान दिले तर या जन्मातः देखील सुख मिळणार नाही, तो श्रीकृष्ण तिने नारदालाच दान दिला. आणि जेव्हा नारदाने आपली विणा श्रीकृष्णाच्या हातात देऊन ,त्याला सोबत घेऊन चालला, तेव्हा द्वारके मध्ये हाहाकार झाला.


 ही कोण मोठी शहाणी? 


श्रीकृष्ण काय हिच्या एकटीच आहे का? 


ही एकटी कोण? त्याला दान देणारी? 

हिच्या बापाने श्रीकृष्णा वरती चोरीचा आळ आणला, ही कृष्णा बरोबरची युद्धला गेली तर, सोळा हजार शंभर सवती घेऊन आली. आणि  आता काय तर ! म्हणे कृष्ण दान दिला? द्वारकेतल्या सगळ्यां नारी तिच्यावरची भडकल्या. तेव्हा खाली मान घालून, सत्यभामा सगळ्यांचे बोलणे ऐकून घेत होती. 

बळीराम सगळे सैन्य घेऊन नारदाच्या मागे लागला. 


त्यावर नारदाने सांगितले मी एकटा ब्रह्मचारी ,गरीब ब्राह्मण, मला मारायला एवढे सैन्य का घेऊन आलात? मी काही श्रीकृष्णाला चोरुन नेत नाही, तर मला सत्यभामेने दान दिला आहे. मग मग तो परत देण्यासाठी उपाय विचारला, तर त्याच्या भारंभार सोनं नारदाने मागितले. मग श्रीकृष्णाची तुला करण्यात आली. एका पारड्यात श्रीकृष्ण ,दुसऱ्या पारड्यात सोनं. सत्यभामेला वाटलं माझ्या घरी स्यमंतक मणी़ आहे . माझ्याकडे भारंभार सोन आहे. 

मी एकटी श्रीकृष्णाला ् सोडवू शकते. . पण प्रत्यक्षात तसं झालं नाही , द्वारकेतल्या सगळ्या लोकांच सोन आणून पारड्यात टाकलं तरी पारड वर जाईना. 

जेव्हा रुक्मिणीने श्रीकृष्णाची आणि नारदाची पूजा करून ,फक्त एक तुळशी पत्र त्या सोन्यावर ठेवले असता ,पारडे आकाशी गेले .मग सगळ्या गोपिकांनी, सगळ्या पट्टराण्यांनी, एवढेच काय स्वतः देवकीने देखील धावून धावून हे माझं सोनं, ते माझं सोनं, हा माझा हार,ती माझी वाकी, असं करत्या सोन्या वरती तुटून पडल्या, आणि फक्त तुळशीच्या एका पानाने श्रीकृष्णाची तुला झाली. तिथेदेखील रुक्मिणी चा भाव दिसला,व सत्यभामेचे गर्वहरण झाले.


  अजून एक प्रसंग आहे जेव्हा हनुमान द्वारके मध्ये भेटीला येतात, तेव्हा हनुमानाच्या त्या रूपाने आधीच सगळे यादव भयभीत झालेले असतात. अशा वेळी श्रीकृष्णाच्या लक्षात येतं की ,आता याला रामावतारातील दर्शन दिले तर हा शांत होईल. 

मग श्रीकृष्ण राम होतात, बळीराम लक्ष्मण होतात, हातातील शंख आणि गदा भरत शत्रुघ्न होतात, आणि सत्यभामेला निरोप पाठवला जातो, की 

तू सीता बनून ये.


 पहिल्यांदा सत्यभामा फारच नटूनथटून जाते, तर सीता तशी दिसत नसते. मग तिला कळत की सीता अशोक वनात पांढरी साडी आणि डोळ्याला काजळ अशी होती. मग ती पांढरी साडी आणि डोळ्यात प्रचंड काजळ भरून जाते, जेणेकरून श्रीकृष्ण तिला एखाद्या भुताची उपमा देतो. 


सीता कवण्यापरी आहे

 देखील कि नाय हो 

हरी बोले रागे 😡रागे

 तू फिरून जाय गे मागे

 रुक्मिणीशी वेगे पाचारूनी आण जा

शेवटी रुक्मिणीला बोलावतात आणि रुक्मिणी सीता बनून समोर येऊन उभी राहते, त्यावेळी देखील तिचा गर्व हरण करायचा असतो, आणि तिला एक प्रकारे दाखवून द्यायचे असते की माझी पट्टराणी तू नसून रुक्मिणी आहे. किंवा तीच माझी जन्मोजन्मीची आदिमाया शक्ती आहे 


अशा सत्यभामेच्या अनेक कहाण्या आहेत. एकदा एका कहाणीमध्ये दुसऱ्या राणीचा वार असताना ,चुकून कृष्ण सत्यभामे चा दरवाजा वाजवतो ,आणि तिला  कशी आहेस मित्रवंदे ? असं विचारतो. 

 त्याबरोबर सत्यभामा देखील कंस राजा तुम्ही कसे आहात विचारते? त्यावर हरी म्हणतो तू माझ्या शत्रूचं नाव घेतेस! तुला काही लाज वाटत नाही का? त्यावर ती म्हणते तुम्ही माझ्या सवतीचे नाव घेता!तुम्हाला काही वाटत नाही का? अशी दोघांच्या नात्यांमध्ये नोक झोक देखील दाखवलेली आहे. 


श्रीकृष्ण आणि सत्यभामे मधील नाते फक्त पती-पत्नीचे नसून ,श्रीकृष्ण तिला, पालक, पिता, बंधु, मित्र या सगळ्यां नात्याने सांभाळत असतो ,तिचे बालिश हट्ट पुरवतो, आणि वेळेत तिला तिची जागा देखील दाखवून देतो. अशी ही श्रीकृष्णाची रुक्मिणी नंतरची लाडकी आवडती राणी. 


 ज्यामध्ये ही सतत काही ना काही गोष्टी करत असते , आणि सतत तोंडावर पडत राहते .परंतु धडा शिकत नाही. तरीही श्रीकृष्णाची पत्नी होणे हा बहुमान तिला मिळाल्याने ती खचितच पुण्यवान होती. असे म्हणावयास पाहिजे.


Rate this content
Log in