शिक्षणातील सातत्य
शिक्षणातील सातत्य


शाळा सुरु झाली. मुले हळू हळू वर्गात हजर राहू लागली. रोजचा पट आलेख वाढू लागला.
रोज सकाळी परिपाठानंतर श्रुतलेखन सुरू केले. गणिती क्रिया देऊ लागले. माझे हे नित्य कार्य चालू केले.
मुले मे महिन्याच्या सुट्टीत बरेच काही विसरलेत हे समजले.
कारण सातत्य नव्हते. गृहपाठ दिला तरी तो मोजक्याच मुलांनी केला होता.
ज्यांच्यासाठी अभ्यास होता त्यांनी साधी वही उघडली नव्हती. परिणामी मुलांचे लेखन मागे पडले. जी मुले छान लिहित होती. बेरीज, वजाबाकी, गुणाकार करीत होते. हीच मुले जरा मागे पडलेली दिसली.
जरा काळजीतच पडले मी. आता परत जोडाक्षरयुक्त शब्दलेखन चालू केले. गणितीक्रिया सुरु केल्या .
शिक्षणात सातत्य असेल तर मुले कोणती गोष्ट विसरत नाहीत.
अनुभवाचे बोल आहेत..