STORYMIRROR

दिपमाला अहिरे

Children Stories Inspirational

3  

दिपमाला अहिरे

Children Stories Inspirational

शिक्षण (लघुकथा)

शिक्षण (लघुकथा)

1 min
196

"अरे काय हे गणेश,मी तुला समजावुन, समजावून

थकले पण तु ऐकायला तयार नाही.. कधीही वेळेवर शाळेत येत नाही.. अभ्यास वेळेवर पूर्ण करत नाही,तुला वाटत नाही का रोज शाळेत यावं, आभ्यास करावा, खूप मोठा माणुस बनावं.तुझी आई बिचारी दिवसभर उन्हातान्हात शेतात राबते.तु शिकुन मोठं व्हावं म्हणून पण तुला तुझ्या आईच्या कष्टाची काही जाणिवच नाही. एक एक पैशाचं मोल तुला काय कळणार आहे?आयुष्यभर तुलापण मोलमजुरी करायची आहे का?" बारा वर्षांच्या गणेश ला बाई रागवत होत्या..

मध्येच एक विद्यार्थी बोलला "बाई ह्यो गण्याबी हाटेलात जातुया कपबशा विसळायला, रसाचे गल्लास वाटायला बी जातुया." बाई सर्व ऐकुन निशब्द झाल्या

पोटाच्या भुकेचा पारडा शिक्षणाच्या पारड्यापेक्षा जड आहे याची त्यांना जाणीव झाली होती..



Rate this content
Log in